वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीनं भलेभले चक्रावले; अश्विन आणि बिश्नोईचा विक्रम मोडला!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीनं भलेभले चक्रावले; अश्विन आणि बिश्नोईचा विक्रम मोडला!

वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीनं भलेभले चक्रावले; अश्विन आणि बिश्नोईचा विक्रम मोडला!

Jan 29, 2025 10:48 AM IST

Varun Chakravarthy Record : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यानं मोठा विक्रम करत आर. अश्विन आणि रवी बिश्नोई यांना मागे टाकलं आहे.

वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीनं भलेभले चक्रावले! अश्विन आणि बिश्नोईचा विक्रम मोडला!
वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीनं भलेभले चक्रावले! अश्विन आणि बिश्नोईचा विक्रम मोडला!

India vs England T20 Series : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट मालिकेत फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांच्या गोलंदाजीमुळं प्रतिस्पर्धी गोलंदाज अक्षरश: चक्रावून गेले आहेत. पहिल्या तीन सामन्यांत १० बळी घेत वरुणनं आर अश्विन आणि रवी बिश्नोई यांचा यांचे विक्रम मोडले आहेत.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात वरुणनं ५ बळी घेतले होते. राजकोटच्या सामन्यातही वरुणच्या फिरकीला इंग्लडंच्या फलंदाजांकडं उत्तर नव्हतं. या सामन्यात त्यानं आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर इंग्लंडच्या अर्ध्या संघाला तंबूत पाठवलं आणि नवा विक्रम आपल्या नावावर करून घेतला.

भारतातील दुरंगी टी-२० मालिकेत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आता फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या नावावर झाला आहे. राजकोट टी-२० सामन्यात वरुण चक्रवर्तीनं जोफ्रा आर्चरला बाद करून दहावा बळी घेतला आणि एका मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्यानं ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला लेग स्पिनर रवी बिश्नोई यांचा विक्रम मोडला.

कोलकात्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात वरुण चक्रवर्तीनं इंग्लंडविरुद्ध ३ विकेट्स घेतल्या होत्या, तर चेन्नईत या फिरकी गोलंदाजाला २ विकेट्स मिळाल्या होत्या. त्याचवेळी राजकोटमध्ये त्यानं ५ गडी बाद केले.

अश्विन, बिश्नोईच्या नावावर काय होता विक्रम?

याआधी २०१६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून खेळल्या गेलेल्या दुरंगी टी-२० मालिकेत आर अश्विननं ९ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. रवी बिश्नोईनं २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तितक्याच विकेट्स घेतल्या होत्या. वरुणनं या दोन्ही गोलंदाजांना मागे टाकलं आहे.

तरीही भारताचा पराभव

वरुण चक्रवर्तीनं घेतलेल्या पाच विकेट्सचा भारतीय संघाला विशेष फायदा झाला नाही आणि संघाला २६ धावांनी पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत अजूनही २-१ नं आघाडीवर असला मालिका जिंकण्याच्या इंग्लंडच्याही आशा कायम आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या