इंग्लंडविरुद्धच्या ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती विशेष प्रभावी ठरला. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात वरुण चक्रवर्ती याने ५ इंग्लिश फलंदाजांची शिकार केली.
वरुणच्या फिरकीपुढे इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्याच्या फिरकीचे रहस्य त्यांना अजिबात समजू शकले नव्हते. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याची विकेट घेत आपले खाते उघडले.
बटलरच्या विकेटनंतर वरूण चक्रवर्तीचे वादळ आल्यासारखे वाटत होते. पहिल्या विकेटनंतर त्याने जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटर्न, ब्रेंडन कारसे आणि जोफ्रा यांना इंग्लंडचे बळी बनवून पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. अशाप्रकारे वरुण चक्रवर्तीने ४ षटकात २४ धावा आणि ५ विकेट घेतल्या.
यासह वरुण चक्रवर्ती टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोनदा ५ बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. वरुणने कारकिर्दीतील केवळ १६व्या सामन्यात दुसऱ्यांदा एका डावात ५ विकेट घेण्याची कामगिरी केली.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत सूर्यकुमार यादवने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली. या सामन्यात इंग्लंडची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली.
मात्र, बेन डकेट याने एका टोकाकडून डाव सांभाळण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि यादरम्यान त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. बेन डकेट व्यतिरिक्त, लियाम लिव्हिंगस्टोन याने काही काळ इंग्लंडच्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळली.
लियाम लिव्हिंगस्टोनने भारतीय गोलंदाजांविरुद्ध काही आकर्षक फटके नक्कीच मारले, पण हार्दिक पांड्याविरुद्ध मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना त्याने ध्रुव जुरेलकडे झेल दिला.
अशाप्रकारे लिव्हिंगस्टोन २४ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला. बेन डकेट आणि लियाम यांच्या व्यतिरिक्त जोस बटलरने इंग्लंडकडून २४ धावा केल्या तर आदिल रशीद आणि मार्क वुडने प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले.
तर भारताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने ५ बळी घेतले. त्याने ४ षटकात २४ धावा दिल्या. हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या आहेत. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी १-१ बळी घेतला.
संबंधित बातम्या