Vaishnavi Sharma : वैष्णवी शर्माने हॅटट्रिक घेतली, ५ धावांत ५ विकेट; भारताने २.५ षटकात सामना जिंकला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Vaishnavi Sharma : वैष्णवी शर्माने हॅटट्रिक घेतली, ५ धावांत ५ विकेट; भारताने २.५ षटकात सामना जिंकला

Vaishnavi Sharma : वैष्णवी शर्माने हॅटट्रिक घेतली, ५ धावांत ५ विकेट; भारताने २.५ षटकात सामना जिंकला

Jan 21, 2025 02:48 PM IST

Vaishnavi Sharma Hattrick : १९ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारी वैष्णवी शर्मा भारताची पहिली गोलंदाज ठरली आहे. वैष्णवीने मलेशियाविरुद्ध हा पराक्रम केला.

Vaishnavi Sharma : वैष्णवी शर्माने हॅटट्रिक घेतली, ५ धावांत ५ फलंदाजांची शिकार, विरोधी संघ ३१ धावांत गारद
Vaishnavi Sharma : वैष्णवी शर्माने हॅटट्रिक घेतली, ५ धावांत ५ फलंदाजांची शिकार, विरोधी संघ ३१ धावांत गारद

Vaishnavi Sharma Womens Under 19 World Cup : अंडर १९ महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाची फिरकीपटू वैष्णवी शर्माने धुमाकूळ घातला आहे. वैष्णवीच्या गोलंदाजीमुळे भारताने मलेशियाला केवळ ३१ धावांत गुंडाळले. वैष्णवीने ४ षटकात केवळ ५ धावा देत ५ बळी घेतले.

विशेष म्हणजे वैष्णवीने तिच्या स्पेलमध्ये हॅटट्रिकही घेतली. वैष्णवीने तिच्या शेवटच्या षटकात सलग तीन चेंडूत तीन फलंदादज बाद केले. यासह अंडर-१९ महिला विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी हॅट्ट्रिक घेणारी ती पहिली गोलंदाज ठरली.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला मलेशियाचा संघ अवघ्या ३१ धावांत सर्वबाद झाला.

वैष्णवीने पहिल्या डावातील १४व्या षटकात हॅट्ट्रिक घेण्याचा चमत्कार केला. वैष्णवीच्या हॅट्ट्रिक षटकातील पहिला चेंडू डॉट होता. त्यानंतर पुढच्या ३ चेंडूंवर तिने नूर ऐन बिंती रोसलान (३), नूर इस्मा दानिया (०) आणि सती नजवाह (०) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

नूर ऐन बिंती रोसलान आणि नूर इस्मा दानिया यांना वैष्णवी शर्माने एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर सती नजवाह हिला बोल्ड करून वैष्णवीने हॅट्ट्रिक पूर्ण केली. वैष्णवीला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीराचा किताब देण्यात आला.

भारताने १० विकेट्सनी सामना जिंकला

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला मलेशियाचा संघ १४.३ षटकांत अवघ्या ३१ धावांत सर्वबाद झाला. एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. संघासाठी नुनी फरिनी सफारी आणि कर्णधार नूर दानिया सिउहादा यांनी प्रत्येकी ५ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.

तर भारताकडून वैष्णवी शर्माने सर्वाधिक ५ बळी घेतले. याशिवाय आयुषी शुक्लाने ३ आणि जोशिता व्हीजेने १ बळी घेतला.

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने अवघ्या २.५ षटकात एकही विकेट न गमावता ३२ धावा करत विजय मिळवला. यादरम्यान, संघासाठी गोंगडी त्रिशाने १२ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने २७* तर जी कमलिनीने ५ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने ४ धावा केल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या