भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावानंतर प्रचंड चर्चेत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात वैभवने एक खास विक्रम केला आहे. UAE मध्ये अंडर-१९ आशिया कप २०२४ खेळला जात आहे.
यातील एका सामन्यात वैभवने विक्रम केला. अंडर १९ टीम इंडियासाठी एकदिवसीय सामना खेळणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्याने पियुष चावला आणि कुमार कुशाग्रा यांचे रेकॉर्ड तोडले आहेत.
वास्तविक, UAE मध्ये अंडर-१९ आशिया कप २०२४ चे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत खेळला जात आहे. या सामन्यात वैभव भारताकडून सलामीला आला. मात्र, तो केवळ १ धावा काढून बाद झाला. या सामन्यात प्रवेश केल्यानंतर वैभव भारताकडून अंडर-१९ एकदिवसीय सामना खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
भारताकडून सर्वात तरुण अंडर-१९ एकदिवसीय सामना खेळण्याचा विक्रम पियुष चावलाच्या नावावर होता. चावलाने २००३ मध्ये वयाच्या १४ वर्षे आणि ३११ दिवसांचा असताना एकदिवसीय सामना खेळला होता.
आता हा विक्रम वैभवच्या नावावर नोंदवला गेला आहे. वैभव सूर्यवंशी वयाच्या १३ वर्षे २४८ दिवसांचा असताना एकदिवसीय सामना खेळला आहे. या बाबतीत कुमार कुशाग्रा आणि शाहबाज नदीम हेही मागे पडले आहेत.
वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२५ मेगा लिलावाच्या निमित्ताने खूप चर्चेत आला. त्याला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएल मेगा लिलावात विकला जाणारा वैभव हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. १९ वर्षांखालील कसोटी सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. वैभवने लहान वयातच मोठे यश संपादन केले आहे.
१३ वर्षे २४८ दिवस - वैभव सूर्यवंशी - २०२४
१४ वर्षे ३११ दिवस - पियुष चावला - २००३
१५ वर्षे ३० दिवस - कुमार कुशाग्र - २०१९
१५ वर्षे १८० दिवस - शाहबाज नदीम - २००५
१५ वर्षे २१६ दिवस - वीरभद्र सिंह गोहिल - १९८५