IPL 2025 Mega Auction Vaibhav Suryavanshi : सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे आयपीएल ऑक्शन सुरू आहे. यामध्ये १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने सर्वाधिक चर्चा मिळवली आहे. आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने वैभवला १.१ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. डावखुरा वैभव मूळचा बिहारचा आहे.
आयपीएल लिलावात विकला जाणारा वैभव हा सर्वात तरुण खेळाडू आहे. तो अवघ्या १३ वर्षांचा असून त्याने लहान वयातच अनेक विक्रम केले आहेत. वैभवने अंडर १९ टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली आहे.
आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चांगलीच चुरस रंगली. पण राजस्थानने बाजी मारली. दिल्ली कॅपिटल्सने वैभववर पहिली बोली लावली. पण दिल्लीने एक कोटी रुपयांपर्यंतची शेवटची बोली लावली. तर राजस्थानने ते १.१० कोटी रुपयांना विकत घेतले. वैभव सूर्यवंशीची मूळ किंमत फक्त ३० लाख रुपये होती.
वैभव सूर्यवंशी हा आयपीएल २०२५ लिलावात सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. वैभव सूर्यवंशी याने नुकतेच बिहारकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
वैभव सूर्यवंशी अवघ्या १३ वर्षांचा आहे. तो डावखुरा फलंदाज आहे. सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-१९ युवा कसोटी मालिकेत सूर्यवंशीने शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो काही कमाल करू शकला नसला तरी त्याच्या नावावर ५ सामन्यांच्या १० डावांमध्ये एकूण १०० धावा आहेत, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ४१ आहे.
जोफ्रा आर्चर (१२.५० कोटी),
वानिंदु हसरंगा (५.२५ कोटी),
महेश थिक्षाना (४.४० कोटी),
आकाश माधवल (१.२० कोटी),
कार्तिकेय सिंग (३० लाख),
नितीश राणा (४.२० कोटी),
तुषार देशपांडे (६.५० कोटी),
फजलहक फारुकी (२ कोटी),
शुभम दुबे (८० लाख)
युद्धवीर सिंग (३० लाख)
वैभव सूर्यवंशी (१.१० कोटी)