PAK vs AUS : चुकीला माफी नाही! उसामा मीरनं १० धावांवर सोपा झेल सोडला, वॉर्नरने १६३ धावा ठोकल्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK vs AUS : चुकीला माफी नाही! उसामा मीरनं १० धावांवर सोपा झेल सोडला, वॉर्नरने १६३ धावा ठोकल्या

PAK vs AUS : चुकीला माफी नाही! उसामा मीरनं १० धावांवर सोपा झेल सोडला, वॉर्नरने १६३ धावा ठोकल्या

Published Oct 20, 2023 11:07 PM IST

PAK vs AUS Highlights : पाकिस्तान क्रिकेट संघासाठी क्षेत्ररक्षण ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी एकापाठोपाठ एक अनेक झेल सोडले.

AUS vs Pak ICC Cricket World Cup 2023
AUS vs Pak ICC Cricket World Cup 2023

AUS vs Pak ICC Cricket World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्डकपचा १८ वा सामना सामना आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव केला. सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव ४५.३ षटकात ३०५ धावांवर गारद झाला. 

तत्पूर्वी, या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी २५९ धावांची मोठी भागीदारी करत पाकिस्तानला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. यामुळे बाबरचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी शतके झळकावली आणि संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.

वॉर्नरचा झेल महागात पडला

मात्र, या दरम्यान पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनीही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खूप मदत केली. डेव्हिड वॉर्नर केवळ १० धावांवर असताना शाहीन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर उसामा मीरने अतिशय सोपा झेल सोडला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने दीडशेहून अधिक (१६३ धावा) धावा केल्या. शतक झळकावल्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज अब्दुल्ला शफीक यानेही वॉर्नरचा झेल सोडला. मिचेल मार्श (१२१ धावा) बाद झाल्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथचा झेलही कर्णधार बाबर आझमने सोडला. 

अशा प्रकारे ४० व्या षटकापर्यंत पाकिस्तानने एकूण ३ सोपे झेल सोडले होते,. याचा ऑस्ट्रेलियन संघाने पुरेपूर फायदा घेतला आणि आपल्या संघाला खूप मोठ्या धावसंख्येकडे नेले. झेल सोडण्याव्यतिरिक्त पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनी मैदानी क्षेत्ररक्षणही चांगले केले नाही. त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमसारख्या छोट्या मैदानावरही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धावूनही रन्स केल्या. गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानची क्षेत्ररक्षण खराब आहे. 

पाकिस्तानने सामना गमावला

ऑस्ट्रेलियाच्या ३६८ धावांचा पाठलाग करताना इमाम उल हकने ७० आणि अब्दुल्ला शफीकने ६४ धावा करत पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २१ षटकात १३४ धावांची भागिदारी केली. मात्र यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. बाबर आझम १८, मोहम्मद रिझवान ४६, सौद शकील ३०, इफ्तिकार अहमद २६ हे फलंदाज ठाराविक अंतराने बाद झाले. त्यामुळे पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही.

ऑस्ट्रेलियातर्फे अॅडम झाम्पाने ४, पॅट कमिन्स आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी दोन गडी बाद केले. पाकिस्तानचा संघ ४५.३ षटकात २०५ धावांवर सर्वबाद झाला आणि ६२ धावांनी सामना गमावला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या