भारतीय क्रिकेट संघ नुकताच श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ३ टी-20 आणि नंतर ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील T20 संघाने मालिकेत क्लीन स्वीप केला. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा वनडे मालिकेत ०-२ असा पराभव झाला. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना टाय झाला होता.
भारत-श्रीलंका मालिकेनंतर टीम इंडियाला २० दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. पण यानंतर टीम इंडियाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार आहे.
कारण लवकरच बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यानंतर न्यूझीलंडचा संघ भारतात येईल. भारतीय संघ वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. तसेच इंग्लंडचा संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात येणार आहे. अशा परिस्थितीत या सर्व मालिकांचे वेळापत्रक आपण येथे जाणून घणार आहोत.
बांगलादेशचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये २ कसोटी आणि ३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. हा दौरा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून शेवटचा सामना १२ ऑक्टोबरला होणार आहे.
पहिली कसोटी: १९ ते २३ सप्टेंबर – एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
दुसरी कसोटी: २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर – ग्रीन पार्क, कानपूर
पहिला T20: ७ ऑक्टोबर - हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला
दुसरा T20: ९ ऑक्टोबर - अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
तिसरा T20: १२ ऑक्टोबर- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही कसोटी मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून ५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
पहिली कसोटी: १६ ते २० ऑक्टोबर – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
दुसरी कसोटी: २४ ते २८ ऑक्टोबर – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
तिसरी कसोटी: १ ते ५ नोव्हेंबर – वानखेडे स्टेडियम, मुंबई
यानंतर नोव्हेंबर महिन्यात भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ४ टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. मालिकेतील पहिला टी-20 सामना ८ नोव्हेंबरला आणि शेवटचा १५ नोव्हेंबरला खेळवला जाईल.
पहिला T20: ८ नोव्हेंबर - किंग्समीड, डर्बन
दुसरा T20: १० नोव्हेंबर- सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा
तिसरा T20: १३ नोव्हेंबर- सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
चौ था T20: १५ नोव्हेंबर - वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
आफ्रिकेनंतर भारतीय संघ नोव्हेंबरच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका २२ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 3 जानेवारी 2025 रोजी संपेल.
पहिली कसोटी: २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: ६ ते १० डिसेंबर, ओव्हल
तिसरी कसोटी: १४ ते १८ डिसेंबर, गब्बा
चौथी कसोटी: २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
५वी कसोटी: ३ ते ७ जानेवारी, सिडनी
इंग्लंडचा संघ पुढील वर्षी जानेवारीच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहे. या कालावधीत दोन्ही संघ ५ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहेत.
पहिला T20: २२ जानेवारी, चेन्नई
दुसरा T20: २५ जानेवारी, कोलकाता
तिसरा T20: २८ जानेवारी, राजकोट
चौथा T20: ३१ जानेवारी, पुणे
पाचवा T20: २ फेब्रुवारी, मुंबई
पहिला वनडे : ६े फेब्रुवारी, नागपूर
दुसरा वनडे: ९ फेब्रुवारी, कटक
तिसरा वनडे: १२ फेब्रुवारी, अहमदाबादs