Bhuvneshwar Kumar : इनस्विंगिंग यॉर्करचा अप्रतिम खेळ, भुवनेश्वर कुमारची सुपर ओव्हर बघितली का?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Bhuvneshwar Kumar : इनस्विंगिंग यॉर्करचा अप्रतिम खेळ, भुवनेश्वर कुमारची सुपर ओव्हर बघितली का?

Bhuvneshwar Kumar : इनस्विंगिंग यॉर्करचा अप्रतिम खेळ, भुवनेश्वर कुमारची सुपर ओव्हर बघितली का?

Sep 07, 2023 07:11 PM IST

Bhuvneshwar Kumar Super Over : भुवनेश्वर कुमारला भलेही आंतरराष्ट्रीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला असेल, पण तरीही त्याच्यात मोठी कामगिरी करण्याची क्षमता आहे. UP T-20 च्या सामन्यात त्याने सुपर ओव्हरमध्ये घातक गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

Bhuvneshwar Kumar
Bhuvneshwar Kumar

टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने उत्तर प्रदेश टी-२० लीगमध्ये आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. नोएडा सुपर किंग्जकडून खेळताना भुवीने काशी रुद्रासविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये झाला. 

वास्तविक, २० षटकांनंतर दोन्ही संघांनी १६५ धावा केल्या. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.

काशी रुद्राजचा डाव

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना काशी रुद्राज संघाने २० षटकांत ७ गडी गमावून १६५ धावा केल्या. त्यांच्यासाठी प्रिन्स यादवने ३२ चेंडूत सर्वाधिक ५० धावांची खेळी केली, तर शिवम बन्सलने ३७ आणि शिवा सिंगने ३६ धावा केल्या. तर नोएडासाठी टीम इंडियाचा स्विंग किंग भुवनेश्वर कुमारने ४ षटकात २/२५, तर कुणाल त्यागी, सौरभ कुमार आणि प्रशांत वीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नोएडा सुपर किंग्जचा डाव

प्रत्युत्तरात नोएडा सुपर किंग्जनेही ७ विकेट गमावत १६५ धावा केल्या. त्यांच्यासाठी नितीश राणाने ५८ धावांची सर्वात मोठी खेळी केली, तर अल्मास शौकत आणि प्रशांत वीर यांनी ३८-३८ धावांची खेळी केली. अटलबिहारी राय याने ४ तर मोहम्मद शरीम आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अशा प्रकारे सामना बरोबरीत सुटला.

असा होता सुपर ओव्हरचा थरार

आता सुपर ओव्हरमध्ये नोएडा सुपर किंग्सने पहिल्यांदाच फलंदाजी केली. तर चेंडू ४ विकेट घेणाऱ्या अटलबिहारी राय याच्या हातात होता, तर नितीश राणा आणि ओशो मोहन फलंदाजीला आले. राणाने ५ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार मारत १६ धावा केल्या, तर ओशोने एक धाव केली. अशा प्रकारे काशीला २० धावांचे लक्ष्य मिळाले. नोएडाकडून भुवी गोलंदाजी करत होता, तर कर्ण शर्मा आणि प्रिन्स यादव फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. भुवीने ६ चेंडूत केवळ ११ धावा देत आपल्या इन-स्विंगिंग यॉर्करचा अप्रतिम खेळ दाखवून सामना जिंकून दिला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या