माजी ICC एलिट पंच आणि तीन वेळा 'वर्ल्ड क्रिकेट अंपायर ऑफ द इयर' चा पुरस्कार जिंकणारे अलीम दार हे लवकरच निवृत्त होणार आहेत. २०२५ चा पाकिस्तानातील देशांतर्गत क्रिकेट हंगामानंतर ते पंचगिरी सोडणार आहेत.
अलीम दार यांचा २००३ ते २०२३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये त्यांचा समावेश होता. ते सध्या पाकिस्तानच्या एलिट पॅनेलमध्ये आहेत आणि आयसीसी आंतरराष्ट्रीय पॅनेलमधील पाकिस्तानच्या ४ पंचांपैकी एक आहेत.
आपण पंचगिरी सोडणार असल्याची घोषणा अलीम दार यांनी शुक्रवारी (२७ सप्टेंबर) केली. ते म्हणाले की, "प्रत्येक महान प्रवास अखेरीस संपतो आणि आता माझ्यासाठी माझ्या सामाजिक आणि परोपकारी कार्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे,"
१९८६-९८ पासून १७ प्रथम श्रेणी सामने आणि १८ लिस्ट ए सामने खेळल्यानंतर दार यांनी १९९९ मध्ये पाकिस्तानच्या देशांतर्गत स्पर्धेत कायद-ए-आझम ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी अंपायरिंग पदार्पण केले.
त्यांनी १४५ कसोटी, २३१ एकदिवसीय, ७२ टी-20 आणि ५ टी-20 विश्वचषकांमध्ये अंपायरिंग केले आहे.
अलीम दार यांना जानेवारी २०२३ मध्ये न्यूझीलंड संघाच्या पाकिस्तान दौऱ्यात मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यांना इंटरनेटवर बेईमान देखील म्हटले गेले.
खरेतर, कराची कसोटीच्या पाचव्या दिवशी, पाकिस्तानला शेवटच्या ३ षटकात विजयासाठी १५ धावांची गरज होती. तर न्यूझीलंड विजयापासून फक्त एक विकेट दूर होता, परंतु खराब प्रकाशामुळे अंपायर अलीम दार यांनी खेळ संपवण्याचा निर्णय घेतला.
यानंतर हा निर्णय त्यावेळी खूप वादग्रस्त ठरला होता. अशा प्रकारे दुसरा सामना आणि मालिका दोन्ही अनिर्णित राहिल्या. या मालिकेतील पहिला सामनाही अनिर्णित राहिला. अलीम दार यांच्यावर आरोप होता की, जर त्यांनीने चुकीचा निर्णय घेतला नसता तर पाकिस्तानी संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला असता.