Pakistan Cricket : उमर अकमलला पैशांची चणचण! सर्वांसमोर ढसाढसा रडला, मुलगी शाळेत गेली नाही
umar akmal : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उमर अकमलला दोषी ठरवले आहे. त्यानंतर या यष्टीरक्षक फलंदाजावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर या खेळाडूला कठीण दिवस पाहावे लागले.
pakistan cricket umar akmal : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२० मध्ये यष्टीरक्षक फलंदाज उमर अकमलवर बंदी घातली होती. वास्तविक, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उमर अकमलला एका प्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर आकमलवर बंदी घालण्यात आली.
ट्रेंडिंग न्यूज
दरम्यान, आता उमर अकमल अतिशय वाईट परिस्थितीत सापडला आहे. त्याच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. एका कार्यक्रमात त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. उमर अकमल म्हणाला, की तो काळ (बंदी घातली गेली तेव्हाचा) माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप आव्हानात्मक होता. तसेच, त्यावेळी त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले हेदेखील त्याने सांगितले.
तो काळ आठवून उमर अकमल रडला
उमर अकमल पाकिस्तान क्रिकेट संघाकडून शेवटचा २०१९ मध्ये खेळला. बंदीच्या दिवसांची आठवण करून उमर अकमल म्हणतो की, मी ज्या प्रकारचे दिवस पाहिले, ते दिवस माझ्या शत्रूंनीही पाहू नये. अल्लाहने माझी परीक्षा घेतली. जेव्हा मी माझ्या वाईट दिवसांतून जात होतो, तेव्हा माझ्या आजूबाजूच्या अनेकांनी त्यांचे खरे रंग दाखवून दिले. त्या लोकांनी मला माझ्या वाईट काळात वाऱ्यावर सोडले. पण मी त्या लोकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला त्या कठीण काळात साथ दिली'.
'माझी बायको सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली, पण...'
उमर अकमलने सांगितले की, मी माझ्या मुलीला जवळपास ८ महिने शाळेत पाठवू शकलो नाही. पण माझ्या पत्नीने मला खाली पडू दिले नाही, ती सावलीसारखी माझ्या पाठीशी उभी राहिली. जेव्हा जेव्हा मला त्या दिवसांची आठवण येते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येते'.
उमर अकमल पुढे म्हणाला, माझ्या पत्नीचे आयुष्य खूप रॉयल होते, पण जेव्हा माझा वाईट काळ आला तेव्हा ती म्हणाली की परिस्थिती कशीही असो पण मी सदैव तुझ्या पाठीशी उभी राहीन. यासाठी मी माझ्या पत्नीचा सदैव ऋणी राहीन".