मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  U19 World Cup 2024 : अंडर १९ विश्वचषकात भारताची धमाकेदार सुरुवात, बांगलादेशचा ८४ धावांनी धुव्वा

U19 World Cup 2024 : अंडर १९ विश्वचषकात भारताची धमाकेदार सुरुवात, बांगलादेशचा ८४ धावांनी धुव्वा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 20, 2024 09:52 PM IST

U19 World Cup 2024 Ind vs Ban : टीम इंडियाने या स्पर्धेत विजयासह सुरुवात केली आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यनंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २५१ धावा केल्या.

U19 World Cup 2024
U19 World Cup 2024

अंडर-१९ विश्वचषकात आज भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने होते. अ गटातील या संघाच हा या स्पर्धेतील पहिलाच सामना होता. या सामन्यात भारताने बांगलादेशचा ८४ धावांनी धुव्वा उडवला आहे.

अशा प्रकारे टीम इंडियाने या स्पर्धेत विजयासह सुरुवात केली आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यनंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संपूर्ण संघ ४५.५ षटकांत १६७ धावांवर गारद झाला.

भारताकडून सौम्या पांडेने गोलंदाजीत ४ विकेट घेतल्या. याशिवाय मुशीर खानने २ विकेट्स घेतल्या. तर राज लिंबानी, अर्शिन कुलकर्णी आणि प्रियांशू मोलिया यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तर बांगलादेशकडून फलंदाजीत मोहम्मद साहिब जेम्सने ७७ चेंडूत सर्वाधिक ५४ धावा धावा केल्या. याशिवाय अरिफुल इस्लामने ४१ धावांचे योगदान दिले. सलामीवीर आशिकुर रहमान आणि झीशान आलम यांनी प्रत्येकी १४ धावांची खेळी केली.

फलंदाजीत भारतीय संघाची खराब सुरुवात

फलंदाजीत टीम इंडियाची सुरुवातही काही खास नव्हती. भारतीय संघाने अवघ्या ३१ धावांत आपले २ विकेट गमावल्या होत्या, परंतु यानंतर सलामीवीर फलंदाज आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांनी जबाबदारी सांभाळली आणि संघाची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. सावध फलंदाजी करत उदय आणि आदर्श यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. मात्र, आदर्श सिंग ७६ धावा करून बाद झाला.

आदर्श सिंग व्यतिरिक्त उदय सहारननेही उत्कृष्ट अर्धशतकी खेळी खेळली. उदयने ९४ चेंडूत ६४ धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने एकूण ४ चौकार मारले. 

याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज अरवली अवनीश आणि प्रियांश मोलिया यांनी प्रत्येकी २३ धावांची खेळी केली, तर शेवटी सचिन धसने २६ धावा केल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने बांगलादेशसाठी निर्धारित ५० षटकांच्या सामन्यात ७ गडी गमावून आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi