अंडर १९ वर्ल्डकपचा थरार आजपासून (१९ जानेवारी) रंगणार आहे. हा १५ वा अंडर -१९ वर्ल्डकप असून दक्षिण आफ्रिकेच्या भुमीवर खेळला जाईल. या स्पर्धेतून क्रिकेट जगताला अनेक मोठे स्टार्स मिळण्याच्या आशा आहेत. या स्पर्धेत २४ दिवसांत फायनलस एकूण ४१ सामने खेळले जातील.
टीम इंडियाने ५ वेळा अंडर-१९ वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे इतर संघांचे लक्ष भारताचे वर्चस्व मोडीत काढण्यावर असणार आहे.
अंडर-१९ वर्ल्डकपचा उद्घाटनचा सामना अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात होणार आहे. तसेच, पहिल्याच दिवशी दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जाईल.
ही स्पर्धा ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून अंतिम सामना बेनोनी येथे होणार आहे. १६ संघांची ४ गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील अव्वल ३ संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील. यानंतर यातील १२ संघांची दोन गटात विभागणी होईल. अव्वल दोन संघ उपांत्य फेरी खेळतील, सेमी फायनलचे सामने बेनोनी येथेच ६ आणि ८ फेब्रुवारी रोजी होणार आहेत.
अ गट- बांगलादेश, भारत, आयर्लंड, अमेरिका
ब गट - इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज
क गट- ऑस्ट्रेलिया, नामिबिया, श्रीलंका, झिम्बाब्वे
ड गट- अफगाणिस्तान, नेपाळ, न्यूझीलंड, पाकिस्तान
भारताला पहिला सामना शनिवारी (२० जानेवारी) बांगलादेशशी होणार आहे. भारत आणि बांगलादेश व्यतिरिक्त अ गटात अमेरिका आणि आयर्लंड आहेत. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजेपासून सुरू होतील.
याआधी ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाणार होती, परंतु आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला नोव्हेंबरमध्ये निलंबित केले होते. त्यानंतर या स्पर्धेचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे हस्तांतरित करण्यात आले.
अंडर-१९ विश्वचषकाचे प्रसारण हक्क स्टार नेटवर्ककडे आहेत. स्टार स्पोर्ट्स वन आणि स्टार स्पोर्ट्स टू हे चॅनेल टीव्हीवर अंडर-१९ वर्ल्डकप सामन्यांचे थेट प्रक्षेपण करतील, तर हॉटस्टार या अॅपवर या स्पर्धेचे लाइव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.
भारतीय संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. यातील अर्शिन कुलकर्णी याला आयपीएलचा करारदेखील मिळाला आहे. तो लखनौकडून खेळताना दिसणार आहे. तर आयपीएलचा करार मिळवणारा आणखी एक खेळाडू अरावेली अश्विनदेखील भारतीय संघात आहे. अरावेली अश्विनला सीएसकेने करारबद्ध केले आहे. यासोबतच गतवर्षीच्या कूचबिहार ट्रॉफीमधील सर्वोत्तम खेळाडू ठरलेला मुशीर खान आणि कर्णधार उदय सहारण यांच्यावरही लक्ष असेल. े
संबंधित बातम्या