मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये भारत बांगलादेशला भिडणार, सामन्याची वेळ आणि लाईव्ह स्ट्रिमिंग, पाहा संपूर्ण माहिती

अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये भारत बांगलादेशला भिडणार, सामन्याची वेळ आणि लाईव्ह स्ट्रिमिंग, पाहा संपूर्ण माहिती

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 19, 2024 10:36 PM IST

India vs Bangladesh U19 World Cup 2024 : बांगलादेशने गेल्या महिन्यात अंडर १९ आशिया कप जिंकला होता. त्यानंतर त्यांनी नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अशा स्थितीत बांगलादेशचा संघ मजबूत दिसत आहे.

India vs Bangladesh U19 World Cup
India vs Bangladesh U19 World Cup

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर अंडर १९ वर्ल्डकपचा थरार सुरू झाला आहे. आज (१९ जानेवारी) या स्पर्धेत दोन सामने खेळले गेले. आता शनिवारी (२०) भारत आपल्या वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजेपासून सुरू होईल.

भारताने ५ वेळा अंडर -१९ वर्ल्डकप जिंकला आहे. ५ वेळा चॅम्पियन असलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व फलंदाज उदय सहारन करणार आहे.

आशिया कपमध्ये भारताचा पराभव

गेल्या महिन्यातच भारत आणि बांगलादेशचे संघ अंडर १९ आशिया कपमध्ये भिडले होते. त्यावेळी सेमी फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा पराभव केला होता. अंडर १९ स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २६ सामने खेळले गेले आहेत. यातील २१ सामने भारताने जिंकले आहेत तर बांगलादेशने केवळ ५ सामने जिंकले आहेत.

बांगलादेशने गेल्या महिन्यात अंडर १९ आशिया कप जिंकला होता. त्यानंतर त्यांनी नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अशा स्थितीत बांगलादेशचा संघ मजबूत दिसत आहे.

बांगलादेशने भारताच्या अंडर १९ संघाविरुद्धच्या शेवटच्या ४ पैकी दोन सामने जिंकले आहेत, त्यामुळे चाहत्यांना शनिवारी मॅनगॉंग ओव्हल येथे एका रोमांचक सामन्याची अपेक्षा असेल. 

मॅंगॉंग ओव्हलची पीच कशी असेल?

मॅंगॉंग ओव्हलची खेळपट्टी ५० षटकांच्या सामन्यासाठी चांगली आहे. यामुळे संपूर्ण सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही काही प्रमाणात मदत मिळते. येथील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या २४८ आहे आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी २५ पैकी १५ सामने जिंकले आहेत.

उदय सहारन भारताचा कर्णधार

बीसीसीआयने या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली होती, या संघाची कमान उदय सहारन याच्याकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय मुंबईकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळणारा सरफराज खान याचा धाकटा भाऊ मुशीरलाही संघात संधी मिळाली आहे. 

अंडर १९ वर्ल्डकपसाठी भारताचा स्क्वॉड

उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौमी कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, अर्शीन कुलकर्णी, इनेश महाजन (विकेटकीपर ), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi