U19 Asia Cup Final : भारताचा धुव्वा उडवत बांगलादेशने आशिया कप जिंकला, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे सगळेच फ्लॉप
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  U19 Asia Cup Final : भारताचा धुव्वा उडवत बांगलादेशने आशिया कप जिंकला, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे सगळेच फ्लॉप

U19 Asia Cup Final : भारताचा धुव्वा उडवत बांगलादेशने आशिया कप जिंकला, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे सगळेच फ्लॉप

Dec 08, 2024 05:39 PM IST

U19 IND vs U19 BAN Fianl : बांगलादेशने अंडर १९ आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप ठरली.

U19 Asia Cup Final : भारताचा धुव्वा उडवत बांगलादेशने आशिया कप जिंकला, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे सगळेच फ्लॉप
U19 Asia Cup Final : भारताचा धुव्वा उडवत बांगलादेशने आशिया कप जिंकला, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे सगळेच फ्लॉप

U19 IND vs U19 BAN Final U19 Asia Cup 2024 : बांगलादेशने अंडर १९  आशिया चषक २०२४ च्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप ठरली.

बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी सलामीला आले. मात्र हे दोन्ही फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. आयुष अवघ्या १ धावा करून बाद झाला. वैभव ९ धावा करून बाद झाला. आंद्रे सिद्धार्थ आणि केपी कार्तिकेयाने संघासाठी काही धावा जोडल्या. सिद्धार्थने ३ चौकारांच्या मदतीने २० धावा केल्या. तर कार्तिकेय २१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

कॅप्टन अमनही काही विशेष करू शकला नाही -

कर्णधार मोहम्मद अमान २६ धावा करून बाद झाला. त्याने ६५ चेंडूंचा सामना करताना १ चौकार मारला. निखिल कुमारला खातेही उघडता आले नाही. यष्टिरक्षक फलंदाज हरवंश सिंग ६ धावा करून बाहेर पडला. किरण चोरमले १ धावा करून बाद झाला. हार्दिक राजने चांगला प्रयत्न केला. त्याने २१ चेंडूत २४ धावा केल्या. या डावात ३ चौकार मारले.

भारताने विजेतेपद गमावले -

टीम इंडियाची सगळी मेहनत वाया गेली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर सलग तीन सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. मात्र येथे त्यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे टीम इंडियाने अंडर १९ आशिया कप २०२४ चे विजेतेपद गमावले आहे.

रिझान हुसेन आणि मोहम्मद शिहाब जेम्स यांनी कमाल केली-

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना भारताविरुद्ध १९८ धावा केल्या होत्या. संघाकडून रिझान हुसेनने ४७ धावांची चांगली खेळी केली. त्याने ३ चौकार मारले. शिहाबने ४० धावांची खेळी खेळली. त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला. कर्णधार अझीझुल हकीम तमीम १६ धावा करून बाद झाला. फरीद हसनने ३९ धावांचे योगदान दिले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या