U19 IND vs U19 BAN Final Asia Cup 2024 : अंडर-१९ आशिया कप २०२४ च्या फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. या पराभवासह त्याने विजेतेपदही गमावले. फायनलमध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांविरुद्ध भारताच्या फलंदांना विशेष काही करता आले नाही. प्रसिद्ध खेळाडू वैभव सूर्यवंशी याची बॅटही शांत राहिली.
पण या स्पर्धेत वैभवपेक्षा कोणत्या खेळाडूची कामगिरी चांगली होती हे तुम्हाला माहीत आहे का? वैभवसोबतच आयुष म्हात्रे यानेही या स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्याने अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली.
अंडर १९ आशिया कपची सुरुवात होताना वैभव सूर्यवंशी याची सर्वाधिक चर्चा झाली. पण तो या स्पर्धेत टीम इंडियासाठी विशेष काही करू शकला नाही. पण ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर आणि आता संपल्यानंतर आयुष म्हात्रे हा भविष्यात मोठा स्टार बनेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या फलंदाजीची स्टाईल ही रोहित शर्मा आणि संजू सॅमनस यांच्यासारखी असल्याचे दिसते. आयुष म्हात्रे हा मुंबईकडून यावर्षी रणजी ट्रॉफी खेळला आहे.
दरम्यान, १९ वर्षांखालील टीम इंडियाने उपांत्य फेरीपर्यंत चांगली कामगिरी केली. मात्र अंतिम फेरीत ५९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
वैभवने उपांत्य फेरीत अर्धशतक झळकावले होते. यापूर्वी त्याने यूएईविरुद्धही स्फोटक खेळी केली होती. पण फायनलमध्ये वैभव सूर्यवंशी ९ धावा करून बाद झाला. आयुष म्हात्रेसुद्धा यात विशेष काही करू शकला नाही. मात्र स्पर्धेतील त्याची एकूण कामगिरी चांगली राहिली.
खरंतर वैभव ओपनिंग बॅटरच्या भूमिकेत होता. आयुषही सलामीला खेळला. पण तो अष्टपैलू खेळाडूच्या भुमिकेत राहिला. वैभवने स्पर्धेतील ५ सामन्यात १७६ धावा केल्या. या स्पर्धेत त्याने १४ चौकार आणि १२ षटकार मारले. आयुषने ५ सामन्यात १७६ धावा केल्या. या स्पर्धेत त्याने २२ चौकार आणि ८ षटकार मारले. आयुषने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही प्रावीण्य दाखवले. त्याने ५ सामन्यात ६ विकेट्सही घेतल्या.
आयुषने अंडर-१९ आशिया कप २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २० धावांची इनिंग खेळली होती. जपानविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावले. त्याने ५४ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने यूएईविरुद्ध नाबाद ६७ धावा केल्या. आयुषने उपांत्य फेरीतही श्रीलंकेविरुद्ध ३४ धावांची उपयुक्त खेळी खेळली होती.
संबंधित बातम्या