मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Bihar Ranji Team : एकाच सामन्यासाठी मैदानात आले बिहारचे दोन संघ, अजिंक्य रहाणेच्या डोळ्यासमोर झाला राडा

Bihar Ranji Team : एकाच सामन्यासाठी मैदानात आले बिहारचे दोन संघ, अजिंक्य रहाणेच्या डोळ्यासमोर झाला राडा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 06, 2024 02:06 PM IST

Bihar vs Mumbai Ranji Match 2024 : सामना सुरू होण्याआधी एक विचित्र प्रसंग पाहायला मिळाला. मुंबईविरुद्धचा सामना खेळण्यासाठी बिहारच्या चक्क दोन टीम मैदानात पोहोचल्या होत्या.

Bihar vs Mumbai Ranji Match 2024
Bihar vs Mumbai Ranji Match 2024

Bihar vs Mumbai Ranji Trophy Match 2024 Controversy : रणजी ट्रॉफीच्या नव्या मोसमाला सुरुवात झाली आहे. पण नव्या सीझनच्या पहिल्याच दिवशी (५ जानेवारी) या स्पर्धेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. पाटणाच्या मोईन उल हक स्टेडियमवर बऱ्याच वर्षानंतर रणजी सामना खेळला जात आहे.

एलिट गटातील हा हा सामना मुंबई आणि बिहार यांच्यात खेळला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी स्टेडियममध्ये चांगलीच गर्दी झाली होती.

पण सामना सुरू होण्याआधी एक विचित्र प्रसंग पाहायला मिळाला. मुंबईविरुद्धचा सामना खेळण्यासाठी बिहारच्या चक्क दोन टीम मैदानात पोहोचल्या होत्या.

बिहारचा क्रिकेटमध्ये वाद, मुंबईविरुद्ध उतरले दोन संघ

वास्तविक, बिहार क्रिकेट असोसिएशनने प्रत्येकी दोन संघांची यादी जाहीर केली. एक संघ बिहार क्रिकेट असोसिएशनचे (BCA) अध्यक्ष राकेश तिवारी यांनी जाहीर केला होता. तर दुसरीकडे बरखास्त केलेले सचिव अमित कुमार यांनी दुसऱ्या संघाची यादी जाहीर केली.

आता दोन्ही संघांपैकी कोणता संघ मुंबईविरुद्ध खेळणार यावरून बीसीएमध्ये वाद सुरू झाला. सकाळी बीसीएचे दोन्ही संघ स्टेडियमबाहेर पोहोचले. मात्र, पोलीस दलाने बरखास्त केलेल्या सचिवांच्या संघाला त्यांच्या बसमध्ये बसवून बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर बीसीएचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी जाहीर केलेल्या संघाने मुंबईविरुद्धच्या सामन्यात भाग घेतला.

अजिंक्य रहाणेही पाटण्यात उपस्थित

विशेष म्हणजे, हा सामना खेळण्यासाठी टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेदेखील पोहोचला आहे. पण त्याने या सामन्यात भाग घेतला नाही. सामना सुरू होण्याआधी तो प्रेक्षकांना भेटण्यासाठी स्टँडजवळही गेला.

या सामन्यात बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी मुंबईने ६७ षटकात ९ गडी गमावून २३५ धावा केल्या. मुंबईकडून भूपेन लालवानीने सर्वाधिक ६५ धावा केल्या. याशिवाय तनुष कोटियन आणि सुवेद पारकर यांनी ५०-५० धावांची खेळी केली.

 

WhatsApp channel