Ind vs Pak Turning Point : शेवटच्या ३ षटकांचा थरार, सिराज, बुमराह आणि अर्शदीपने असा फिरवला सामना, वाचा-turning point of india vs pakistan t20 world cup 2024 last 3 overs know ball by ball what happens know in details ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Pak Turning Point : शेवटच्या ३ षटकांचा थरार, सिराज, बुमराह आणि अर्शदीपने असा फिरवला सामना, वाचा

Ind vs Pak Turning Point : शेवटच्या ३ षटकांचा थरार, सिराज, बुमराह आणि अर्शदीपने असा फिरवला सामना, वाचा

Jun 10, 2024 12:38 PM IST

Ind vs Pak Match Turning Point : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर बाबर आझमने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. यानंतर बाबरच्या गोलंदाजांनी भारताच्या दिग्गज फलंदाजांना १९ षटकात अवघ्या ११९ धावांत गारद केले. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांना त्यांचा संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते.

Ind vs Pak Turning Point : शेवटच्या ३ षटकांचा थरार, सिराज, बुमराह आणि अर्शदीपने असा फिरवला सामना, वाचा
Ind vs Pak Turning Point : शेवटच्या ३ षटकांचा थरार, सिराज, बुमराह आणि अर्शदीपने असा फिरवला सामना, वाचा

ind vs pak t20 world cup 2024  : टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. खरं तर ९ जूनच्या रात्री भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांसह संपूर्ण क्रिकेट जगताने जे पाहिले, जे अनुभवले ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. भारतीय संघाने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. ११९ धावांत ऑलआऊट झाल्यानंतरही भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ धावांनी धुव्वा उडवला.

न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर बाबर आझमने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. यानंतर बाबरच्या गोलंदाजांनी भारताच्या दिग्गज फलंदाजांना १९ षटकात अवघ्या ११९ धावांत गारद केले. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांना त्यांचा संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते.

पण भारतीय गोलंदाजांनी तसे होऊ दिले नाही. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या दोघांचा राहिला, दोघांनी अनुक्रमे ३ आणि २ बळी घेतले. भारतीय गोलंदाजांनी हातातून गेलेला सामना परत आणला.

भारतीय गोलंदाजांनी संपूर्ण २० षटके पाकिस्तानी फलंदाजांवर दडपण ठेवले. विकेट मिळत नव्हत्या पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना सहज धावा करू दिल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तान संघावर दबाव निर्माण झाला आणि घबराट निर्माण झाली.

मात्र, पाकिस्तानच्या डावाच्या शेवटच्या ३ षटकांत भारताने खेळ पूर्णपणे आपल्या दिशेने फिरवला. शेवटच्या ३ षटकात काय घडले ते बॉल बाय बॉल जाणून घेऊया.

१८ वे षटक- मोहम्मद सिराज

पाकिस्तानच्या डावातील १८ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज आला. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर इमाद वसीमने सिंगल घेतला. यानंतर सिराजने पुढचा चेंडू नो बॉल टाकला. इफ्तिखार अहमद फ्री हिटवर विशेष काही करू शकला नाही. त्याने फक्त एकच घेतली. षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. ओव्हरचा पाचवा चेंडू वाईड होता. पण यानंतर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवरही एकच धाव आली. अशाप्रकारे सिराजने १८व्या षटकात ९ धावा दिल्या.

१९वे षटक- जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहने डावातील १९ वे आणि निर्णायक षटक टाकले. इमाद वसीमला त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकच धाव घेता आली. दुसऱ्या चेंडूवर इफ्तिखार अहमदला एकही धाव करता आली नाही. तिसऱ्या चेंडूवरही त्याला काहीच करता आले नाही. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर लेग बायची एक धाव आली. षटकाच्या पाचव्या चेंडूवर इमाद वसीमने पुन्हा एकच धाव घेतली. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इफ्तिखार अहमद बाद झाला. अशाप्रकारे १९व्या षटकात केवळ ३ धावा आल्या.

२०वे षटक- अर्शदीप सिंग

अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या डावातील शेवटचे आणि २०वे षटक टाकले. पाकिस्तानला विजयासाठी १८ धावांची गरज होती. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर इमाद वसीम बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर नसीम शाहने एकेरी घेतली. शाहीन आफ्रिदीने तिसऱ्या चेंडूवर लेग बायच्या रुपात एक धाव घेतली. यानंतर नसीम शाहने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार ठोकले. शेवटच्या चेंडूवर नसीमला एकच धाव घेता आली. अशाप्रकारे अर्शदीपने शेवटच्या षटकात केवळ ११ धावा दिल्या.

Whats_app_banner