चिन्नास्वामीच्या बालेकिल्ला असलेल्या बेंगळुरूमध्ये ट्रॅव्हिस हेडने गोलंदाजांचा धुव्वा उडवला आहे. हेडने या मोसमातील सर्वात वेगवान शतक ठोकले आहे. त्याने अवघ्या ३९ चेंडूत झळकावले.
शतकानंतर पुढच्याच षटकात ट्रेव्हिस हेड बाद झाला. त्याने ४१ चेंडूत १०२ धावा कुटल्या. हेडच्या बॅटमधून ९ चौकार आणि ८ षटकार आले.
इंडियन प्रीमियर लीगच्या ३०व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आरसीबीचे होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडने धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्येच ७१ धावा ठोकल्या.
अभिषेक आणि हेडने पहिल्या विकेटसाठी अवघ्या ८ षटकात १०८ धावांची सलामी दिली. यावेळी हेडने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर अभिषेक शर्मा २२ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला.
शर्मा बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेन फलंदाजीला आला. ट्रेव्हिस हेडने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. त्याने ३९ चेंडूत शतक पूर्ण केले. हेड ४१ चेंडूत १०२ धावा करून बाद झाला. लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. फाफ डुप्लेसिसने त्याचा झेल घेतला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विषक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटीकपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोलायचे झाले दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले गेले आहेत. यापैकी बंगळुरूने १० आणि हैदराबादने १२ सामने जिंकले आहेत.
तर चिन्नास्वामी येथे या दोघांमध्ये ८ सामने खेळले गेले आहेत. यापैकी बेंगळुरूने ५ आणि हैदराबादने २ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.
संबंधित बातम्या