Travis Head Hundred : ट्रॅव्हिस हेड थांबायचं नावच घेईना! टीम इंडियाविरुद्ध झळकावलं आणखी एक शतक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Travis Head Hundred : ट्रॅव्हिस हेड थांबायचं नावच घेईना! टीम इंडियाविरुद्ध झळकावलं आणखी एक शतक

Travis Head Hundred : ट्रॅव्हिस हेड थांबायचं नावच घेईना! टीम इंडियाविरुद्ध झळकावलं आणखी एक शतक

Dec 15, 2024 11:11 AM IST

Travis Head Hundred, Ind vs Aus Test : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड याने भारताविरुद्ध आणखी एक शतक झळकावले आहे. त्याने गाबा कसोटीत ११६ चेंडूत शतक पूर्ण केले.

Travis Head Hundred : ट्रॅव्हिस हेड थांबायचं नाव घेईना! टीम इंडियाविरुद्ध झळकावलं आणखी एक शतक
Travis Head Hundred : ट्रॅव्हिस हेड थांबायचं नाव घेईना! टीम इंडियाविरुद्ध झळकावलं आणखी एक शतक (AFP)

Travis Head Century Brisbane, IND vs AUS 3rd Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT) २०२४-२५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू आहे. आज (१५ डिसेंबर) या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेड याने आणखी एक शतक झळकावले आहे.

हेडचे हे कसोटी कारकिर्दीतील ९वे आणि भारताविरुद्धचे तिसरे शतक आहे. हेडने ॲडलेड कसोटीतही शतक झळकावले होते.

ट्रॅव्हिस हेडने आपल्या खेळीत एकूण १३ चौकार मारले. हे शतक ठोकण्याबरोबरच त्याने टीम इंडियाला बॅकफूटवरही ढकलले आहे. हेडचे हे शतकही संस्मरणीय आहे कारण ब्रिस्बेनमध्ये खेळलेल्या गेल्या तीन डावांत तो गोल्डन डकचा बळी ठरला होता.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ मधील ट्रॅव्हिस हेडचे हे दुसरे शतक आहे आणि हेडने ५० किंवा त्याहून अधिक वैयक्तिक धावा करण्याची ५ डावांमध्ये तिसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने ॲडलेड पिंक बॉल कसोटीत १४० धावांची इनिंग खेळली होती.

पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही त्याने ८९ धावांची खेळी केली होती.

भारताविरुद्ध १००० कसोटी धावा पूर्ण केल्या

या शतकी खेळीत ट्रॅव्हिस हेडने आणखी एक विक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध एक हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो आता १३वा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड

भारत- यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप

Whats_app_banner

संबंधित बातम्या