वर्ष २०२४ चे आता शेवटचे काही दिवस राहिले आहेत. हे वर्ष संपण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच, गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या खेळाडूंची यादी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका यूट्यूबरकडून बॉक्सिंग लढत हरलेला महान बॉक्सर माईक टायसन सर्वाधिक सर्च झालेल्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पहिले स्थान इमान खलिफ हिला मिळाले आहे. इमान पॅरिस ऑलिम्पिक २०२४ दरम्यान तिच्या लिंगामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. नंतर इमान खलीफा ही महिला नसून एक पुरुष असल्याचे समोर आले.
२०२४ मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या खेळाडूंमध्ये इमान खलीफ नंबर वन, माइक टायसन दुसरा आणि स्पॅनिश फुटबॉलपटू लमिन यामल हा तिसऱ्या स्थानावर राहिला.
२०२४ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या सातव्या स्थानावर आहे. हार्दिक या वर्षी अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. टी-20 विश्वचषक २०२४च्या फायनलमध्ये पंड्याने शेवटचे षटक टाकले होते.
या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा सीमारेषेवर धावत जात झेल टिपला होता. हार्दिकने या षटकात केवळ ९ धावा दिल्या आणि टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यापूर्वी, आयपीएलमध्येही हार्दिक प्रचंड ट्रोल झाला होता. कारण मुंबई इंडियनन्सने संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडून हार्दिकला दिले होते.
त्यानंतर हार्दिक या वर्षी पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यामुळेही चर्चेत राहिला. यानंतर गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर, सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले, तेव्हाही हार्दिकची प्रचंड चर्चा झाली.
यानंतर शशांक सिंग या यादीत नवव्या स्थानावर आहे, ज्याला आयपीएल २०२५ साठी पंजाब किंग्सने रिेटेन केले होते. शशांकने आयपीएल २०२४ मध्ये पंजाबसाठी १४ सामन्यांत ३५४ धावा केल्या होत्या. १६४ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला.
संबंधित बातम्या