भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटला भारतात धर्माचा देण्यात आला आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना क्रिकेट मनापासून आवडते. त्यामुळे या विषयावर बनवलेले चित्रपटही अनेकदा हिट ठरतात. अशा स्थितीत आपण आज येथे क्रिकेटवर बनवलेल्या काही चित्रपटांबाबत जाणून घेणार आहोत.
जेव्हा जेव्हा क्रिकेटवर बनलेल्या चित्रपटांची चर्चा होते तेव्हा प्रत्येकाच्या मनात पहिले नाव लगान या चित्रपटाचेच येते. त्याचे कथानक चित्रपटाच्या नावावरच आहे. चित्रपटात भारताच्या स्वतंत्र्यापूर्वीचा काळ दाखवण्यात आला आहे. अमिर खान स्टारर हा चित्रपट आजही अनेकांना खूप आवडतो.
भारताने १९८३ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. या पार्श्वभुमीवर हा ८३ चित्रपट बनवण्यात आला. यात रणवीर सिंग कपिल देवच्या भुमिकेत आहे.
मे २०२४ मध्ये रिलीज झालेला राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर चित्रपट मिस्टर अँड मिसेस माही हा देखील क्रिकेटवर आधारित एक उत्तम चित्रपट आहे. क्रिकेटमध्ये अपयशी झाल्यानंतर पती आपल्या पत्नीला क्रिकेटर बनवतो, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट खूप मनोरंजन करणार आहे. जो तुम्हाला कधी हसवेल तर कधी भावूक करेल.
अभिषेक बच्चन आणि सयामी खेर स्टारर चित्रपट घूमर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला. अभिनेत्री सयामी खेर हिने अनिना नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटात, सयामी तिच्या आयुष्यात झालेल्या अपघातातून सावरते आणि एका हाताने गोलंदाजी करायला शिकते. अभिषेक बच्चन यात प्रशिक्षकाच्या भुमिकेत आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिक २०१६ मध्ये रिलीज झाला होता, जो चाहत्यांना खूप आवडला. तुम्ही एमएस धोनीचे चाहते असाल तर हा चित्रपट तुम्ही कधीही पाहू शकता. तुम्हाला तो खूप आवडेल.
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला काई पो चे हा चित्रपट प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या “थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ” या कादंबरीवर आधारित आहे. क्रिकेट आणि मैत्रीचा सुंदर मिलाफ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
हा चित्रपट ९० च्या दशकातील भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा बायोपिक आहे. हा चित्रपट मे २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते.
इमरान हाश्मी स्टारर जन्नत हा सिनेमा २००८ मध्ये प्रदर्शित झाला, ज्यामध्ये क्रिकेटमध्ये होणारी फिक्सिंग आणि बेटिंग दाखवण्यात आली होती. क्रिकेटशिवाय इम्रान हाश्मीची प्रेमकहाणीही चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
या चित्रपटात एका मुक्या मुलाची कथा दाखवण्यात आली आहे, जो आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन क्रिकेट खेळतो आणि टीम इंडियापर्यंत पोहोचतो. नसीरुद्दीन शाह हे या चित्रपटात प्रशिक्षकाच्या भुमिकेत आहेत.
सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या कारकिर्दीवर आधारित एक माहितीपट आहे, जो २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता.
संबंधित बातम्या