ILT20 Video : थर्ड अंपायरनं रन आऊट दिलं, पण प्रतिस्पर्धी संघानं फलंदाजाला परत बोलावलं, मैदानावर घडली विचित्र घटना
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ILT20 Video : थर्ड अंपायरनं रन आऊट दिलं, पण प्रतिस्पर्धी संघानं फलंदाजाला परत बोलावलं, मैदानावर घडली विचित्र घटना

ILT20 Video : थर्ड अंपायरनं रन आऊट दिलं, पण प्रतिस्पर्धी संघानं फलंदाजाला परत बोलावलं, मैदानावर घडली विचित्र घटना

Jan 26, 2025 05:48 PM IST

ILT20 Viral Video : दोन्ही फलंदाजांनी सहज धावा पूर्ण केल्या पण टॉम करन याने षटक संपले असे समजून क्रीज सोडली. पण त्यानंतर जे घडलं ते क्रिकेट रसिक कधीच विसरणार नाहीत.

ILT20 Video : थर्ड अंपायरने रन आऊट दिलं, पण विरोधी संघानं फलंदाजाला परत बोलावलं, मैदानावर घडली विचित्र घटना
ILT20 Video : थर्ड अंपायरने रन आऊट दिलं, पण विरोधी संघानं फलंदाजाला परत बोलावलं, मैदानावर घडली विचित्र घटना

ILT20 लीगमध्ये शनिवारी (२५ जानेवारी) गल्फ जायंट्स आणि गतविजेता एमआय एमिरेट्स आमनेसामने होते. या रोमांचक सामन्यात गल्फ जायंट्सने एमआय एमिरेट्सचा पराभव केला. त्याचवेळी या सामन्यात जबरदस्त नाट्य पाहायला मिळाले. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.

या सामन्यात एमआय एमिरेट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५१ धावा केल्या. एमआय एमिरेट्सकडून टॉम बँटन याने सर्वाधिक ५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात गल्फ जायंट्सने शेवटच्या चेंडूवर ८ गडी गमावून लक्ष्य गाठले.

पण या सामन्याच्या शेवटच्या षटकात एक विचित्र प्रकार घडला. ही घटना चाहते कधीच विसरणार नाहीत.

नेमकं काय घडलं?

गल्फ जायंट्सला शेवटच्या १३ चेंडूत १८ धावा करायच्या होत्या. गल्फ जायंट्सकडून टॉम करन आणि मार्क एडेअर फलंदाजी करत होते. १८व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मार्क एडेअरने लाँगऑफवर एक धाव घेतली.

दोन्ही फलंदाजांनी सहज धावा पूर्ण केल्या पण टॉम करनने षटक संपले असे समजून क्रीज सोडली. पण इतक्यात किरॉन पोलार्ड याने चेंडू उचलून कीपरच्या दिशेने फेकला. यानंतर यष्टिरक्षक निकोलस पूरनने बेल्स उडवल्या आणि धावबादचे आपील केले. यानंतर थर्ड अंपायरने टॉम करनला बाद घोषित केले.

पण खरा ड्रामा आता सुरू झाला... टॉम करन पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला, पण त्याच दरम्यान गल्फ जायंट्सचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी सीमारेषेबाहेर उभे राहून याचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली. अँडी फ्लॉवर टॉम करनला मैदानावरच थांबण्याची सूचना केली.

तर एमआय एमिरेट्चे खेळाडूही हे पाहून चांगलेच संतापले. परंतु वेळ वाया जात असल्याचे पाहून त्यांनी टॉम करनला परत फलंदाजीस बोलावण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा सामना शेवटच्या षटकापर्यंत सुरू राहिला. ज्यामध्ये गल्फ जायंट्सने २ गडी राखून रोमांचक विजय नोंदवला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या