मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mumbai Traffic News : मुंबईत आज टीम इंडियाची विजयी मिरवणूक; वाहतुकीत मोठे बदल, 'हे' ७ रस्ते राहणार बंद

Mumbai Traffic News : मुंबईत आज टीम इंडियाची विजयी मिरवणूक; वाहतुकीत मोठे बदल, 'हे' ७ रस्ते राहणार बंद

Jul 04, 2024 12:29 PM IST

Mumbai Traffic Police Advisory for Today : टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कप विजय साजरा करण्यासाठी मुंबईत आज विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामुळे शहरातील ७ रस्ते बंद राहणार आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे.

मुंबईत आज टीम इंडियाची विजयी मिरवणूक, 'हे' ७ रस्ते राहणार बंद, वाहतूक पोलिसांनी दिली माहिती
मुंबईत आज टीम इंडियाची विजयी मिरवणूक, 'हे' ७ रस्ते राहणार बंद, वाहतूक पोलिसांनी दिली माहिती (Sukumaran)

Mumbai Traffic News Today : टी-20 वर्ल्डकप २०२४ जिंकल्यानंतर भारतीय संघ आज (४ जुलै) बार्बाडोसहून भारतात परतला आहे. भारतीय खेळाडूंना घेऊन सकाळी ६ वाजता एक विशेष विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. टीम इंडिया विमानतळावरून थेट त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचली. यानंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहे. यानंतर भारतीय संघ मुंबईला रवाना होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई वाहतूकीत बदल 

या विजयाचा जल्लोष आणखी भव्य करण्यासाठी मुंबईत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी मुंबई वाहतूक पोलीस पूर्णपणे सज्ज असून मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गांबाबत सूचना जारी केली आहे.

मुंबईतील हे रस्ते बंद केले जातील

नरिमन पॉइंट ते मरीन ड्राईव्हवरील वानखेडे स्टेडियमपर्यंत सायंकाळी ५ ते ७ या वेळेत टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण मुंबईतील ७ रस्ते बंद करण्यात येणार आहेत. 

एन एस रोड (उत्तर बाजू): NCPA ते मेघदूत ब्रिज पर्यंत बंद राहील.

पर्यायी मार्ग : रामनाथ पोद्दार चौक, महर्षी कर्वे रोड, अहिल्याबाई होळकर चौक, मरीन लाईन्स, चरणी रोड, पंडित पळूसकर चौक.

एन एस रोड रोड (दक्षिण बाजू): मेघदूत पुलापासून NCPA/हुतात्मा राजगुरू चौकापर्यंत बंद राहील.

पर्यायी मार्ग: केम्प्स कॉर्नर ब्रिज किंवा आरटीआय जंक्शन येथून डावीकडे वळा.

वीर नरिमन रोड (उत्तर बाजू): अहिल्याबाई होळकर चौक ते किलाचंद चौकापर्यंत बंद राहील.

पर्यायी मार्ग : महर्षी कर्वे रोड, अहिल्याबाई होळकर चौक, मरीन लाईन्स, चरणी रोड, पंडित पळूसकर चौक.

दिनशॉ रस्ता (उत्तर बाजू): वाय ए ए चौक ते रतनलाल बाबुना चौकापर्यंत बंद राहील.

पर्यायी मार्ग : महर्षी कर्वे रोड, अहिल्याबाई होळकर चौक, मरीन लाइन्स, चरणी रोड, पंडित पळूसकर चौक.

मादाम कामा रोड (उत्तर बजू): हुतात्मा राजगुरू चौक ते वेणूताई चव्हाण चौकापर्यंत बंद राहील.

पर्यायी मार्ग : महर्षी कर्वे रोड, रामनाथ पोद्दार चौक, अहिल्याबाई होळकर चौक, मरीन लाईन्स, चरणी रोड, पंडित पळूसकर चौक.

बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग (उत्तर बाजू): साखर भवन जंक्शन ते एनएस रोडपर्यंत बंद राहील.

पर्यायी मार्ग: हॉटेल ट्रायडंटपासून साखर भवन जंक्शनकडून उजवीकडे वळा, नंतर बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग आणि उषा मेहता चौक-फ्री प्रेस सर्कलकडे जा.

विनय के शाह मार्ग (उत्तर बाजू): जमनालाल बजाज मार्ग ते मुरली देवरा चौक आणि एनएस रोडपर्यंत बंद राहील.

पर्यायी मार्ग: रामनाथ गोएंका मार्गाने साखर भवन जंक्शनकडे जा, नंतर बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग आणि फ्री प्रेस सर्कलकडे जा.

पार्किंग बंदी

विजय मिरवणुकीसाठी निश्चित केलेल्या मार्गावर पार्किंगलाही बंदी घालण्यात आली आहे. एनएस रोड, वीर नरिमन रोड, मादाम कामा रोड, फ्री प्रेस मार्ग, दिनशॉ वाचा रोड आणि महर्षी कर्वे रोडवर दिवसभर पार्किंग करण्यास मनाई असेल. विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने जमनालाल बजाज मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग, रामनाथ गोएंका मार्ग, विनय के शाह रस्ता वगळता सकाळपासून रात्रीपर्यंत पार्किंगवर बंदी असेल.

WhatsApp channel