श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेत श्रीलंकेने २-० असा विजय मिळवला. अशा प्रकारे श्रीलंकेने १५ वर्षानंतर न्यूझीलंडला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी केली.
मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात किवी संघाला एक डाव आणि १५४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. संघ हरला पण कर्णधार टीम साऊदी याने मोठी कामगिरी केली आहे. अवघ्या १० धावांची इनिंग खेळून टीम साऊदीने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याला मागे सोडले.
डेव्हॉन कॉनवे, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात थोडीशी झुंज दिली. मात्र, डाव ३१० धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने केवळ १० धावा केल्या. टीम साऊदीने १० धावांच्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला.
या एका षटकाराच्या जोरावर टीम साऊदीने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला मागे टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत टीम साउथी सातव्या स्थानावर पोहोचला आहे. साउदीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ८९ षटकार आहेत. ब्रायन लारा ८८ षटकारांसह आठव्या स्थानावर घसरला आहे.
आता भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागचा विक्रम टीम साउथीच्या निशाण्यावर आहे. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये ९१ षटकार मारले आहेत. टीम साउथी फक्त तीन हिट दूर आहे. या यादीत इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
१३१- बेन स्टोक्स (इंग्लंड) १०५ सामन्यात
१०७ - ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) १०१ सामन्यात
१०० - ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) ९६ सामन्यात
९८ - 103 सामन्यात ख्रिस गेल (वेस्ट इंडिज).
९७ - जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) १६६ सामन्यात
९१ - वीरेंद्र सेहवाग (भारत/आयसीसी) १०४ सामन्यांमध्ये
८९ - टीम साऊदी (न्यूझीलंड) १०२ सामन्यात
८८ - ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) १३१ सामन्यात
संबंधित बातम्या