टीम इंडियाने विजयासह दक्षिण आफ्रिका दौरा संपवला आहे. टीम इंडियाने चौथ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १३५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे आनंदात असणाऱ्या टीम इंडियाला आणखी एक गुड न्यूज मिळाली.
भारताचा विश्वविजेता कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला आहे. त्याची पत्नी रितिका हिने एका मुलाला जन्म दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर विजयाचे नायक असलेले तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी BCCI टीव्हीवर टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवशी संवाद साधला.
या संभाषणाच्या शेवटी, सूर्यकुमारने तिलक आणि संजूला रोहितचे अभिनंदन करण्यास सांगितले. यादरम्यान तिलकने, अशा शुभेच्छा दिल्या की सूर्यकुमार आणि संजू दोघांनाही हसू आवरले नाही.
सूर्यकुमार म्हणाला की, रोहित शर्मा पिता झाला आहे, त्याचे अभिनंदन करताना तुम्हाला काय म्हणायचे आहे. यावर तिलक वर्मा म्हणाला, "आम्ही खूप आनंदी आहोत. रोहित भाई या क्षणाची वाट पाहत होते. एक-दोन दिवस उशीर झाला असता तर मीच तिथे पोहोचलो असतो." यावर सूर्यकुमार म्हणाला, "अरे लड़के अब रुलाएगा क्या?"
तेव्हा तिलक म्हणाले, "मी आत्ता येतोय तुमच्या मुलाला बघायला. मला खूप आनंद झाला आहे."
यानंतर संजूची पाळी आली, तेव्हा तो लाजत होता. मग तो म्हणाला, “रोहित भाई आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप आनंद झाला. सुपर हॅप्पी.”
यानंतर सूर्यकुमार म्हणाला की, आता लहान पॅड्स आणि बॅट घेऊन जाण्याची तयारी करावी लागेल कारण रोहितला मुलगा झाला आहे, म्हणजेच दुसरा क्रिकेटर आला आहे".
दरम्यान, रोहित याच कारणामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला नाही. तो पत्नी रितिकासोबत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना २२ तारखेपासून सुरू होत असून या सामन्यात रोहित खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.