दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात तुफानी फलंदाजी करताना तिलक वर्मा याने ५१ चेंडूत शतक पूर्ण केले. तिलक वर्माचे हे टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक आहे. सेंच्युरियनमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली. तिलक याच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०० धावांचा टप्पा पार केला. तिलक याने अभिषेक शर्मासोबतही चांगली भागीदारी केली.
तिलक वर्माने या शतकी खेळीत ८ चौकार आणि ६ षटकार मारले. याआधी तिलक वर्माने अवघ्या ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. २२ वर्षीय तिलक वर्मा हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
तिलकने अँडिले सिम्पालाविरुद्ध १९व्या षटकातील ५व्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.
टीम इंडियाच्या या डावात तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाची सुरुवात विशेष झाली नाही, पण तिलक वर्मा यांनी आपल्या दमदार फलंदाजीने भारतीय संघाच्या धावगतीचा वेग कधीच थांबू दिला नाही.
तिलक टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा भारताचा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. तिलकने वयाच्या २२२ व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. त्याच्याआधी यशस्वी जैस्वालनेही शतक झळकावले होते. यशस्वीने वयाच्या २१ वर्षे २७९ दिवसांत शतक झळकावले. यशस्वीने नेपाळविरुद्ध शतक झळकावले होते.
टिळक वर्माने टीम इंडियासाठी १०७ धावांची खेळी खेळली, तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. या खेळीत तिलकने ५६ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले. त्याच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाला २१९ धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला आता सामना जिंकण्यासाठी २२० धावांची गरज आहे.