Tilak Varma Century IND vs SA : तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्फोटक कामगिरी करत शतक झळकावले आहे. त्याने टी-20 सामन्यात सलग दुसरे शतक झळकावले आहे.
टीम इंडियासाठी फलंदाजी करताना तिलकने टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात शतक झळकावले. या खेळीत त्याने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. तिलक याच्यासोबत संजू सॅमसननेही शतक झळकावले.
याआधी संजू सॅमसनने टीम इंडियासाठी लागोपाठ दोन टी-20 सामन्यात शतके झळकावण्याचा पराक्रमही केला होता. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात तिलक वर्माने १२० धावांची नाबाद खेळी केली आणि संजूच्या या विक्रमाची बरोबरी केली.
अभिषेक वर्मा बाद झाल्यानंतर तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला आणि पहिले काही चेंडू सावधपणे खेळल्यानंतर त्याने आपला गियर बदलला आणि त्यानंतर तो थांबण्याची चिन्हे दिसली नाहीत. तिलक वर्माने मैदानाच्या चारही दिशांना चौकार आणि षटकार मारत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
तिलकने ४७ चेंडूंचा सामना करताना त्याने नाबाद १२० धावा केल्या. तिलकने या खेळीत १० षटकार आणि ९ चौकार लगावले. त्याच्यासोबत सॅमसननेही शतक झळकावले. सॅमसनने नाबाद १०९ धावा केल्या. त्यांच्या दोन्ही शतकांच्या जोरावर भारताने २८३ धावा केल्या.
तिलकने रोहितचा खास विक्रम मोडला. भारतासाठी सर्वात मोठी टी20 धावसंख्या बनवण्याच्या बाबतीत त्याने रोहितला मागे टाकले आहे. तिलकने या सामन्यात नाबाद १२० धावा केल्या आहेत. तर रोहितची सर्वोच्च धावसंख्या ११८ आहे. त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते. टीम इंडियासाठी सर्वाधिक टी-20 धावा करण्याचा विक्रम शुभमन गिलच्या नावावर आहे. गिलने २०२३ मध्ये नाबाद १२६ धावा केल्या होत्या.
भारताची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन: रायन रिकेल्टन, रीझा हेन्ड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॉन्सन, गेराल्ड कोएत्झी, अँडिले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामला.