Womens T20 WC Ticket : 'या' लोकांना फुकटात मिळणार महिला टी-२० विश्वचषकाची तिकिटे!-tickets go on sale for womens t20 world cup free entry for under 18s ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Womens T20 WC Ticket : 'या' लोकांना फुकटात मिळणार महिला टी-२० विश्वचषकाची तिकिटे!

Womens T20 WC Ticket : 'या' लोकांना फुकटात मिळणार महिला टी-२० विश्वचषकाची तिकिटे!

Sep 25, 2024 07:15 PM IST

Womens T20 World Cup 2024 Tickets: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. सामन्याच्या तिकिटाची किंमतही अत्यंत परवडणारी ठेवण्यात आली आहे.

महिला टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील तिकीट विक्रीला सुरुवात
महिला टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील तिकीट विक्रीला सुरुवात

Womens T20 World Cup: संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईत पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाच्या तिकिटांना बुधवारपासून सुरुवात झाली आहे. सर्वात कमी किमतीचे तिकीट पाच दिरहम म्हणजेच ११४ रुपये आहे. स्पर्धेचा पहिला सामना ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे स्पर्धा सुरू होण्याच्या आठवडाभर आधी तिकिटे विक्रीसाठी सोडण्यात आली आहेत. ही स्पर्धा आधी बांगलादेशात होणार होती, पण तेथील राजकीय अस्थिरतेमुळे ती युएईकडे हलविण्यात आली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'प्रेक्षकांची पोहोच लक्षात घेऊन तिकिटांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. सर्वात कमी किमतीचे तिकीट ५ दिरहम आहे तर प्रीमियम सीटचे तिकीट ४० दिरहम  (सुमारे ९१० रुपये) आहे. ज्या दिवशी दोन सामने खेळले जातील, त्या दिवशी एकाच तिकिटावर दोन्ही सामन्यांसाठी प्रवेश मिळणार आहे.

१८ वर्षांखालील प्रेक्षकांना मोफत प्रवेश

१८ वर्षांखालील प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. महिला टी-२० विश्वचषकात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सह १० देश सहभागी होणार आहेत. अंतिम सामना २० ऑक्टोबर ला होणार आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ २४ सप्टेंबर रोजी भारतातून रवाना झाला. हरमनप्रीत कौरने रवाना होण्यापूर्वी सांगितले होते की, यावेळी संघ आतापर्यंतचा सर्वोत्तम संघ आहे आणि जेतेपद जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

भारतासमोर मोठे आव्हान

भारतीय संघ गेल्या तीन वेळा आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात विजेतेपदाच्या जवळ आहे, पण बाद फेरीचा अडथळा पार करू शकलेला नाही. दोनवेळा सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन संघ बाहेर पडला, तर एकदा फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला, हरमनप्रीत कौर म्हणाली की, एक दिवस फक्त वाईट होता, उर्वरित स्पर्धेत संघाची कामगिरी चांगली होती.

भारतीय महिला संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), मिताली राज, जेमिमाह रॉड्रिग्ज, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिष्ट, डी हेमलता, मानसी जोशी, पूजा वस्त्राकार, अरुंधती रेड्डी.

Whats_app_banner
विभाग