एकाच सामन्यात ३ खेळाडू गंभीर जखमी, दोघांना स्ट्रेचरवरून न्यावं लागलं, सीएसकेला मोठा धक्का-three players injured in ban vs vs sl odi match jaker ali mustafizur rahman stretchered off soumya sarkar injury ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  एकाच सामन्यात ३ खेळाडू गंभीर जखमी, दोघांना स्ट्रेचरवरून न्यावं लागलं, सीएसकेला मोठा धक्का

एकाच सामन्यात ३ खेळाडू गंभीर जखमी, दोघांना स्ट्रेचरवरून न्यावं लागलं, सीएसकेला मोठा धक्का

Mar 18, 2024 06:35 PM IST

Mustafizur Rahman Injury : बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडू खेळणार आहे. पण आता मुस्तफिझूर रहमनाची दुखापत सीएसकेसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Mustafizur Rahman Injury एकाच सामन्यात ३ खेळाडू जखमी, दोघांना स्ट्रेचरवरून न्यावं लागलं, सीएसकेला मोठा धक्का
Mustafizur Rahman Injury एकाच सामन्यात ३ खेळाडू जखमी, दोघांना स्ट्रेचरवरून न्यावं लागलं, सीएसकेला मोठा धक्का (X)

आयपीएल २०२४ चा थरार अवघ्या चार दिवसांमध्ये सुरू होणार आहे. पण त्याआधी चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का लागला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज गंभीररित्या दुखापतग्रस्त झाला आहे.

वास्तविक, सध्या बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दोन खेळाडूंना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात तीन खेळाडू जखमी झाले.

सर्वात प्रथम, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याला क्रॅम्पमुळे मैदानाबाहेर जावे लागले. त्याला चालताही येत नव्हते. त्यामुळे मुस्तफिजूरला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर घेऊन जावे लागले, तर काही वेळाने ऑलराऊंडर सौम्या सरकार क्षेत्ररक्षण करताना जाहिरात फलकावर आदळला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली.

मुस्तफिझूर आणि झाकेर अली स्ट्रेचरवर मैदानाबाहेर 

बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडू खेळणार आहे. पण आता मुस्तफिझूर रहमनाची दुखापत सीएसकेसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सामना सुरू होता. या सामन्यादरम्यान, मुस्तफिजुर रहमानने क्रॅम्पमुळे मैदान सोडले. तर त्यानंतर सौम्या सरकार चेंडू रोखण्याचा प्रयत्न करत असताना मैदानावरील जाहिरात फलकावर आदळला. यावेळी त्याच्या मानेला दुखापत झाली. त्याच्या जागी झाकेर अली पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला.

पण यानंतर झाकीर अली देखील क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. त्यालादेखील रुग्णालयात घेऊन जावे लागले. तस्किन अहमदच्या चेंडूवर प्रमोद मदुशानचा झेल घेण्याच्या प्रयत्नात अनामूल हक आणि झाकेर अली यांच्यात टक्कर झाली, त्यानंतर झाकेरला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

पंचांनीही मैदान सोडलं

तीन खेळाडू जखमी झाल्यानंतर सामन्यातील पंच रिचर्ड केटलबरो हेदेखील मैदानातून बाहेर गेले. वास्तविक, प्रचंड उष्णतेमुळे केटलबरो यांना मैदान सोडावे लागले. उष्णतेच्या त्रासामुळे रिचर्ड केटलबरो यांच्या जागी तन्वीर अहमद यांनी पंचगिरी केली.

अशा प्रकारे एकाच सामन्यात ४ वेगवेगळ्या घटना घडल्या. चेन्नई सुपर किंग्जची नजर मुस्तफिजूरवर असेल. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघातील अनेक खेळाडू आधीच दुखापतग्रस्त आहेत. जर बांगलादेशी वेगवान गोलंदाज तंदुरुस्त झाला नाही तर तो संघासाठी मोठा धक्का असेल.