ऑस्ट्रेलियाचा महिला अंडर-१९ संघ लवकरच श्रीलंका आणि न्यूझीलंडसोबत तिरंगी मालिका खेळणार आहे. टी-20 तिरंगी मालिका १९ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या काळात सुरू होईल आणि यानंतर या तीन संघांमध्ये एकदिवसीय स्वरूपाची मालिकाही खेळवली जाईल.
दरम्यान, या तिरंगी मालिकेपूर्वी भारतीय वंशाचे ३ खेळाडू सध्या चर्चेत आले आहेत.या तिन्ही खेळाडूंना या तिरंगी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. हसरत गिल, समारा दुल्विन आणि रिबिया सायन अशी या ३ खेळाडूंची नावे आहेत.
समारा डल्विनबद्दल बोलायचे तर ती उजव्या हाताची फलंदाज आहे, तिने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियन अंडर-१९ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दुसरीकडे, रिबिया सायन उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करते आणि चांगली फलंदाजी करणारी अष्टपैलू म्हणून ओळखली जाते.
हसरत गिलही वेगवान गोलंदाजी करते, ती यापूर्वी श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये कांगारू संघाकडून खेळली आहे.
हसरत अमृतसरची आहे, पण नंतर तिचे कुटुंब ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले. श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्धच्या तिरंगी मालिकेत ती सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होती. याशिवाय तिने फलंदाजी करताना ४८ धावांचे योगदान दिले होते. गिल महिला बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळली आहे.
ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी T20 आणि ODI तिरंगी मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे.
या तिरंगी मालिकेत, प्रत्येक संघ ४ टी-20 सामने खेळेल, तर प्रत्येक संघ २-२ एकदिवसीय सामने खेळताना दिसेल. ऑस्ट्रेलियाची माजी खेळाडू क्रिस्टन बीम्स हिची या संघाची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संघात ३ भारतीय वंशाच्या खेळाडूंच्या समावेशाबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, "तिघींचाही संघात समावेश केल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील वाढती विविधता आणि भारतीय खेळाडूंचे महत्त्वही दिसून येते.