या तीन कारणांमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाच्या हाती येणार नाही, रोहित शर्मा ठरू शकतो मोठी अडचण
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  या तीन कारणांमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाच्या हाती येणार नाही, रोहित शर्मा ठरू शकतो मोठी अडचण

या तीन कारणांमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाच्या हाती येणार नाही, रोहित शर्मा ठरू शकतो मोठी अडचण

Published Feb 08, 2025 07:51 PM IST

Champions Trophy 2025 : भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात ठेवण्यात आले आहे. भारताच्या गटात पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड आहेत. दुबईत या सघांचा रेकॉर्ड जबरदस्त आहे.

या तीन कारणांमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाच्या हाती येणार नाही, रोहित शर्मा ठरू शकतो मोठी अडचण
या तीन कारणांमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाच्या हाती येणार नाही, रोहित शर्मा ठरू शकतो मोठी अडचण (REUTERS)

Indian Cricket Team : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस उरल आहेत. भारतीय संघ नुकताच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये लाजिरवाणा पराभव पत्करून आला आहे. अशा स्थितीत रोहित आणि कंपनीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी करून आपले हरवलेले वैभव परत मिळवण्याची संधी आहे.

इतर संघांप्रमाणेच भारताच्या संघातही अनेक त्रुटी आहेत, जे चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब कामगिरीचे कारण बनू शकतात. चला तर मग जाणून घेऊया टीम इंडियातील उणीवांबद्दल. 

१) रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा खराब फॉर्म

सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली खूपच खराब फॉर्मात आहेत. दोघेही भारतीय संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू आहेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे दोन सर्वात मजबूत आधारस्तंभ असतील. 

पण दुर्दैवाने, त्यांचा खराब फॉर्म त्यांच्यासाठी आणि टीम इंडियासाठीही चिंतेचा विषय ठरत आहे. कसोटी सामन्यांतील खराब कामगिरी आणि त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्येही फॉर्ममध्ये सुधारणा न झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढत आहे. दोन वरिष्ठ खेळाडू असूनही विराट आणि रोहित टीम इंडियावर ओझे बनत आहेत.

२) एकदिवसीय सामन्यांचा कमी सराव

२०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार हे ठाऊक असतानाही BCCI ने टीम इंडियासाठी २०२४ मध्ये खूपच कमी एकदिवसीय मालिका नियोजित केल्या होत्या. २०२४ मध्ये भारतीय संघ फक्त ३ एकदिवसीय सामने खेळला. अशा स्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचा सराव कमी पडला आहे. हा एकदिवसीय सामन्यांचा कमी सराव भारतीय संघासाठी हानिकारक ठरू शकतो.

३) दुबईत टीम इंडियाचा रेकॉर्ड खराब 

भारतीय संघाचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने हायब्रीड मॉडेल अंतर्गत दुबईत खेळवले जातील. २०२१ च्या टी-२० विश्वचषकात दुबईचे मैदान भारतासाठी दुःस्वप्न ठरले. भारतीय संघ त्या स्पर्धेच्या गट टप्प्यातच बाद झाला होता. या मैदानावर पाकिस्तान आणि न्यूझीलंड टीम इंडियाचा पराभव करू शकतात. कारण दुबई या दोन्ही संघांचा रेकॉर्ड जबरदस्त आहे.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या