IPL 2025 Best Bowling Squad : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात जवळपास प्रत्येक संघाने गोलंदाजांवर बराच पैसा खर्च केला. याचा अर्थ प्रत्येक संघाने आपली गोलंदाजी मजबूत करणयाचा प्रयत्न केला आहे.
आयपीएल मेगा ऑक्शननंतर प्रत्येक संघांच्या गोलंदाजी विभागाकडे नजर टाकली तर जवळपास सर्वच संघ तगडे दिसत आहे.
विशेष म्हणजे, यावेळी मोहम्मद शमी, मिचेल स्टार्क, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांच्या संघात बदल झाला आहे. सीझन सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे, पण त्याआधी सर्व १० संघांमध्ये कोणाची गोलंदाजी लाईन-अप सर्वोत्कृष्ट आहे हे जाणून घेऊया.
मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनआधी जसप्रीत बुमराह याला १८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते, त्यामुळे साहजिकच बुमराह एमआयच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करेल. यावेळी संघात ट्रेंट बोल्ट, दीपक चहरसारखे स्विंग मास्टर्सही आले आहेत, तर एमआयने अफगाणिस्तानच्या युवा फिरकी गोलंदाज अल्ला गझनफर याच्या साथीने आपले गोलंदाजी आक्रमण मजबूत केले आहे. फिरकी गोलंदाजीत गझनफरसोबत मिचेल सँटनर आणि कर्ण शर्माही असतील. MI कडे हार्दिक पंड्या हा जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू देखील आहे.
आयपीएल २०२५ साठी सनरायझर्स हैदराबादनेही आपले गोलंदाजी आक्रमण पूर्वीपेक्षा मजबूत केले आहे. कर्णधार पॅट कमिन्स पुन्हा फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवताना दिसणार आहे. यावेळी त्याला साथ देण्यासाठी मोहम्मद शमीही SRH मध्ये आला असून हर्षल पटेलचे संथ चेंडू कोणत्याही संघाच्या फलंदाजीला भेदण्यास सक्षम आहेत.
बॅकअप म्हणून, संघात ब्रेडन कार्स, जयदेव उनाडकट, सिमरजीत सिंग आणि श्रीलंकेचा स्टार इशान मलिंगा आहे. फिरकीची जबाबदारी राहुल चहर आणि ॲडम झाम्पावर असेल.
गुजरात टायटन्सने मेगा लिलावात कोणावरही फारशी बोली लावली नाही, पण गुजरात आयपीएल २०२५ मधील सर्वात मजबूत संघांपैकी एक असल्याचे दिसते. यावेळी वेगवान गोलंदाजीची कमान कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा आणि प्रसीध कृष्णावर असेल. त्यांच्याशिवाय गेराल्ड कोएत्झी आणि भारताचा युवा स्टार अर्शद खान हे देखील संघात आहेत.
गुजरातकडेही मजबूत फिरकी आक्रमण आहे, ज्याचे नेतृत्व राशिद खान करेल. वॉशिंग्टन सुंदर आणि साई किशोर त्याला साथ देणार आहेत.
संबंधित बातम्या