SRH ते PBKS! या तीन IPL संघात सर्वात तगड्या ऑलराऊंडर्सची फौज, फलंदाजी आणि गोलंदाजीनं सामना फिरवू शकतात
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH ते PBKS! या तीन IPL संघात सर्वात तगड्या ऑलराऊंडर्सची फौज, फलंदाजी आणि गोलंदाजीनं सामना फिरवू शकतात

SRH ते PBKS! या तीन IPL संघात सर्वात तगड्या ऑलराऊंडर्सची फौज, फलंदाजी आणि गोलंदाजीनं सामना फिरवू शकतात

Dec 02, 2024 11:40 AM IST

IPL 2025 Best All Rounders : आयपीएल २०२५ मध्ये अनेक संघांमध्ये मजबूत फलंदाज आहेत. पण काही संघांकडेच चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत.

SRH ते PBKS! या तीन IPL संघात सर्वात तगड्या ऑलराऊंडर्स फौज, फलंदाजी आणि गोलंदाजीनं सामना फिरवू शकतात
SRH ते PBKS! या तीन IPL संघात सर्वात तगड्या ऑलराऊंडर्स फौज, फलंदाजी आणि गोलंदाजीनं सामना फिरवू शकतात

IPL 2025 Gujarat Titans Punjab Kings Sunrisers Hyderabad : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. यावेळी मेगा लिलावात ऋषभ पंत सर्वात महागडा ठरला. त्याला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींना विकत घेतले. पण यातील काही संघांनी अष्टलपैलू खेळाडूंना टार्गेट केले. अशा स्थितीत आपण कोणत्या संघात तगडे ऑलराऊंडर्स आहेत, हे जाणून घेणार आहोत.

सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबाद हा संघ खूप मजबूत आहे. त्यांच्याकडे अनेक महान खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर हैदराबादकडे असे ५ खेळाडू आहेत. अभिषेक शर्मा स्फोटक फलंदाजीमध्ये माहिर आहे. तसेच, त्याने गोलंदाजीत विकेट्सही घेतल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी आणि हर्षल पटेल हे देखील संघात आहेत. हैदराबादकडेही चांगले फलंदाज आहेत. हेन्रिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड आणि इशान किशन हे संघासाठी महत्त्वाचे ठरतील.

पंजाब किंग्ज

पंजाब किंग्ज संघाकडे पाहिल्यास त्यांच्याकडे एकूण ९ अष्टपैलू खेळाडू आहेत. यामध्ये ४ खेळाडू अतिशय धोकादायक आहेत. पंजाबने मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेलला विकत घेतले आहे. मॅक्सवेल यापूर्वी आरसीबीचा भाग होता. स्टॉइनिस लखनौ सुपर जायंट्समध्ये होता. 

हरप्रीत ब्रार हादेखील तगडा खेळाडू आहे. त्याने स्वत:ला सिद्धही केले आहे. गोलंदाजीसोबतच त्याने फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. मार्को यान्सेन आणि अजमतुल्ला उमरझाई हेही खेळाला कलाटणी देण्यात पटाईत आहेत.

गुजरातकडेही अष्टपैलू खेळाडूंची फौज

गुजरात टायटन्सकडेही ९ अष्टपैलू खेळाडू आहेत. वॉशिंग्टन सुंदर हा संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. सुंदरने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने टीम इंडियासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

निशांत संथू, महिपाल लोमरोर, साई किशोर, साई सुदर्शन आणि करीम जनात हे संघासाठी महत्त्वाचे खेळाडू ठरू शकतात. गुजरात संघाने एकदा विजेतेपद पटकावले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या