Ranji Trophy : रणजी ट्रॉफीचे हे तीन नवे स्टार आयपीएल गाजवू शकतात, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy : रणजी ट्रॉफीचे हे तीन नवे स्टार आयपीएल गाजवू शकतात, पाहा

Ranji Trophy : रणजी ट्रॉफीचे हे तीन नवे स्टार आयपीएल गाजवू शकतात, पाहा

Feb 26, 2024 11:20 AM IST

Ranji Trophy Star Performers : मुंबईचा मुशीर खान नुकताच अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. विश्वचषकात मुशीरची बॅट चांगलीच बोलली. याशिवाय तो आता रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे.

Ranji Trophy IPL
Ranji Trophy IPL

आयपीएल २०२४ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २२ मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीत अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये कॅप्ड आणि अनकॅप्ड अशा दोन्ही खेळाडूंनी चांगलेच प्रभावित केले आहे.

पण आज आम्ही तुम्हाला अशा तीन रणजी ट्रॉफीत दम दाखवलेल्या खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे आगामी काळात आयपीएलमध्येही खळबळ माजवू शकतात. त्या खेळाडूंवर एक नजर टाकूया.

मुशीर खान

मुंबईचा मुशीर खान नुकताच अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. विश्वचषकात मुशीरची बॅट चांगलीच बोलली. याशिवाय तो आता रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात त्याने दमदार द्विशतक झळकावले. त्याने २०३ धावांची नाबाद खेळी खेळली. मुशीरकडे प्रतिभा आहे. हे त्याच्या फलंदाजीतही दिसून येते. जर मुशीरला आयपीएलमध्ये संधी मिळाली तर तो तिथेही आपले नाव कोरू शकतो.

सरफराज खान

मुशीर खानचा मोठा भाऊ सरफराज खान याने रणजी ट्रॉफीमध्ये खूप धावा केल्या आहेत. त्याने ४६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७० च्या सरासरीने ४०४२ धावा केल्या आहेत. या काळात त्याने १४ शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत. सर्फराजने याआधीच आयपीएलमध्ये पदार्पण केले केले. आरसीबीकडून खेळताना त्याने काही चांगल्या खेळीही केल्या आहेत. पण त्यानंतर सरफराज अचानक गायब झाला. मात्र आता तो सध्या करिअरच्या शिखरावर असून त्याला संधी मिळाल्यास तो खळबळ उडवू शकतो.

बाबा अपराजित

तामिळनाडूच्या बाबा अपराजितनेही रणजी ट्रॉफीमध्ये आपले नाव गाजवले आहे. आतापर्यंत, त्याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एकूण ९० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १४१ डावांमध्ये ४५७१  धावा केल्या आहेत. त्याने ११ शतके आणि २३ अर्धशतकेही झळकावली आहेत. बाबा संधी मिळाल्यास आयपीएलमध्येही धावा करू शकतात.

Whats_app_banner