Five uncapped players to Watch out in IPL 2025 : आयपीएलचा १८वा सीझन २२ मार्चपासून सुरू होत आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र, या सीझनमध्येही दरवर्षी्प्रमाणे काही अनकॅप्ड खेळाडूंवर लक्ष असणार आहे, हे अनकॅप्ड खेळाडू आपल्या खेळाने सर्वांना चकित करण्याची ताकद ठेवतात.
आपण येथे अशाच ५ अनकॅप्ड खेळाडूंवर एक नजर टाकू जे आयपीएलच्या २०२५ मध्ये आपली छाप पाडू शकतात.
राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी याने ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाविरुद्ध ५८ चेंडूत शतक झळकावले होते. सोबतच तो अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत त्याने शानदार फलंदाजी केली होती. सध्या वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये राहुल द्रविडच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेत आहे.
वास्तविक, वैभव सूर्यवंशी अवघा १३ वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली तर तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरू शकतो.
आयपीएल मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने रॉबिन मिंजला ६५ लाख रुपयांना खरेदी केले. रॉबिन मिन्झ झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. त्याच्या स्फोटक फलंदाजीशिवाय, रॉबिन मिन्झ हा यष्टिरक्षक म्हणून ओळखला जातो. वास्तविक, रॉबिन मिन्झ आयपीएल २०२४ च्या हंगामात गुजरात टायटन्सचा भाग होता, परंतु रस्ता अपघातामुळे तो खेळू शकला नाही.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सूर्यांश शेडगेने १५ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार मारले. त्या सामन्यात सुर्यांश शेडगेच्या संघाने मध्य प्रदेशसमोर १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सूर्यांश शेडगेने २५२ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने ८ विकेट्सही घेतल्या. यानंतर पंजाब किंग्जने आयपीएल मेगा लिलावात सूर्यांश शेडगेला आपल्या संघाचा भाग बनवले.
आंद्रे सिद्धार्थ हा तामिळनाडूचा दिग्गज माजी क्रिकेटर एस शरथ याचा पुतण्या आहे. सी आंद्रे सिद्धार्थ तामिळनाडू प्रीमियर लीग व्यतिरिक्त रणजी ट्रॉफीमध्ये खेळला आहे. आंद्रे सिद्धार्थने रणजी ट्रॉफीमध्ये ६८ च्या सरासरीने ६१२ धावा केल्या आहेत. आंद्रे सिद्धार्थबद्दल अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
न्यूझीलंडचा बेव्हॉन-जॉन जेकब्स मुंबई इंडियन्सचा भाग आहे. बेव्हॉन जेकब्सने त्याच्या पहिल्या ६ टी-20 सामन्यांमध्ये १८९ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. बेव्हॉन जेकब्सने आतापर्यंत २० टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये या फलंदाजाने जवळपास १५० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या