टी-20 वर्ल्डकप २०२४ साठी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह २० संघ सज्ज झाले आहेत. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टी-20 वर्ल्डकपचे १६ सामने यूएसएमध्ये खेळले जाणार आहेत, तर उर्वरित ३९ सामने कॅरेबियन बेटांवर खेळले जातील. या स्पर्धेत बाद फेरीसह एकूण ५५ सामने खेळले जातील. ही स्पर्धा २९ दिवस चालेल.
टी-20 हा फॉरमॅट फलंदाजांचा समजला जातो. पण क्रिकेट जगतात असे काही वेगवान गोलंदाज आहेत. ते फलंदाजीच्या पीचवरही आपल्या गोलंदाजीची जादू दाखवू शकतात.
अशा परिस्थितीत आपण येथे अशाच गोलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत, जे फलंदाजांसाठी असलेल्या या फॉरमॅटमध्ये आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालू शकतात.
ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड या सर्व संघांमध्ये असे वेगवान गोलंदाज आहेत, जे ताशी १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करू शकता. यामध्ये मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह, शाहीन आफ्रिदी, जोफ्रा आर्चर, ट्रेंट बोल्ट यांचा समावेश आहे.
मिचेल स्टार्क:
मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आहे. स्टार्क ताशी १६० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकतो. मिचेल स्टार्कने आतापर्यंत २० टी-20 विश्वचषक सामने खेळले आहेत. या २० सामन्यांमध्ये त्याने ८.३५ च्या इकॉनॉमीने २७ बळी घेतले आहेत.
शाहीन आफ्रिदी:
शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आहे. शाहीन आफ्रिदी ताशी १५४.४ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकतो. शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत १३ टी-20 विश्वचषक सामने खेळले आहेत. या १३ सामन्यांमध्ये त्याने ६.५९ च्या इकॉनॉमीने १८ बळी घेतले आहेत.
जोफ्रा आर्चर:
जोफ्रा आर्चर हा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आहे. आर्चर ताशी १५३.६२ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकतो. जोफ्रा आर्चरने एकही टी-२० वर्ल्डकप सामना खेळलेला नाही. हा त्याचा पदार्पण T20 विश्वचषक आहे. जोफ्रा आर्चरने आतापर्यंत १७ टी-२० सामने खेळले आहेत. या १७ सामन्यांमध्ये त्याने ७ च्या इकॉनॉमीने २१ विकेट घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराह:
जसप्रीत बुमराह हा भारताचा वेगवान गोलंदाज आहे. बुमराह ताशी १५३.२६ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकतो. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत १० T20 विश्वचषक सामने खेळले आहेत. या १० सामन्यांमध्ये त्याने ६.४१ च्या इकॉनॉमीने ११ बळी घेतले.
ट्रेंट बोल्ट:
ट्रेंट बोल्ट हा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आहे. बोल्ट ताशी १४३.३ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकतो. ट्रेंट बोल्टने आतापर्यंत १४ टी-20 विश्वचषक सामने खेळले आहेत. या १४ सामन्यांमध्ये त्याने ६.५७ च्या इकॉनॉमीने २५ बळी घेतले आहेत.
संबंधित बातम्या