मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Purple Cap IPL 2024 : पर्पल कॅप जिंकण्याचे सर्वात मोठे दावेदार, यंदा कोण घेईल सर्वाधिक विकेट? पाहा

Purple Cap IPL 2024 : पर्पल कॅप जिंकण्याचे सर्वात मोठे दावेदार, यंदा कोण घेईल सर्वाधिक विकेट? पाहा

Mar 10, 2024 02:37 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Purple Cap Contenders for IPL 2024 : आयपीएल २०२४ लवकरच सुरू होणार आहे. आयपीएलच्या या सीझनमध्ये पर्पल कॅप जिंकू शकणाऱ्या ५ गोलंदाजांबाबत आपण येथे जाणून घेणार आहोत.

IPL 2024 चा थरार लवकरच सुरु होणार आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या या लीगमध्ये फलंदाज आणि गोलंदाज आपापल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान देण्याचा प्रयत्न करतील. ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी फलंदाजांमध्ये शर्यत असेल, तर दुसरीकडे गोलंदाज सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकायचा प्रयत्न करतील. आयपीएल २०२४ मध्ये पर्पल कॅप जिंकू शकणाऱ्या गोलंदाजांवर एक नजर टाकूया.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

युझवेंद्र चहल - राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युझी चहल याचा आयपीएल रेकॉर्ड जबरदस्त आहे. चहलने १४२ आयपीएल सामन्यांमध्ये १८३ विकेट्स घेतल्या आहेत. चहल राजस्थान रॉयल्स आधी २०१४-२०२१ या दरम्यान रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु टीमच्या गोटात होता. चहलने २०२१ च्या आयपीएलमध्ये २७ विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती. चहल यंदाही पर्पल कॅप जिंकण्याचा दावेदार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

राशिद खान - अफगाणिस्तानचा लेगस्पिन गोलंदाज राशिद खानने टी-20 स्पेशालिस्ट म्हणून जगात आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने १७ सामन्यात २७ विकेट घेतल्या होत्या. क्षणात सामना फिरवण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे तो सर्वांपेक्षा वेगळा गोलंदाज म्हणून पुढे आला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

मिचेल स्टार्क- मिचेल स्टार्क आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यामुळे तो यंदा कशी कामगिरी करतो, यावर सर्वांच्या नजरा असतील. २०१५ नंतर तो आयपीएल खेळणार आहे. केकेआरने त्याला २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात त्याने शानदार गोलंदाजी केली करत १६ विकेट घेतल्या होत्या. यामुळे आयपीएल २०२४ मध्येही त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

पॅट कमिन्स-  आयपीएल २०२४ मध्ये सर्वांच्या नजरा विशेषतः पॅट कमिन्सवर असतील. यावेळी तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे, SRH ने त्याला २०.५० कोटी रुपये देऊन विकत घेतले. कमिन्स या संघाचा कर्णधार देखील असेल. आयपीएल कारकिर्दीत कमिन्सने ४२ सामन्यांमध्ये ४५ विकेट घेतल्या आहेत. तो पर्पल कॅप जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार असेल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

जसप्रीत बुमराह-  जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मध्ये खेळू शकला नाही. परंतु २०२४ मध्ये तो मुंबई इंडियन्स संघात दिसणार आहे. बुमराहने आयपीएलच्या १२० सामन्यांमध्ये १४५ विकेट घेतल्या आहेत. बुमराहने यापूर्वी कधीही पर्पल कॅप जिंकली नाही, परंतु बुमराहला सध्याच्या काळातील सर्वोत्तम गोलंदाज मानले जाते. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

जसप्रीत बुमराह-  जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मध्ये खेळू शकला नाही. परंतु २०२४ मध्ये तो मुंबई इंडियन्स संघात दिसणार आहे. बुमराहने आयपीएलच्या १२० सामन्यांमध्ये १४५ विकेट घेतल्या आहेत. बुमराहने यापूर्वी कधीही पर्पल कॅप जिंकली नाही, परंतु बुमराहला सध्याच्या काळातील सर्वोत्तम गोलंदाज मानले जाते. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज