शशांक सिंग ते मोहसीन खान… २० लाखांचे अनकॅप्ड खेळाडू करोडपती झाले, दिवाळीच्या दिवशीच नशीब चमकलं, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  शशांक सिंग ते मोहसीन खान… २० लाखांचे अनकॅप्ड खेळाडू करोडपती झाले, दिवाळीच्या दिवशीच नशीब चमकलं, पाहा

शशांक सिंग ते मोहसीन खान… २० लाखांचे अनकॅप्ड खेळाडू करोडपती झाले, दिवाळीच्या दिवशीच नशीब चमकलं, पाहा

Updated Oct 31, 2024 10:31 PM IST

IPL 2025 Retention : इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठी रिटेन्शन लिस्ट प्रसिद्ध झाली आहे. रिटेन्शनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक ६-६ खेळाडूंना रिटेन केले आहे. रिटेन्शनमध्ये अनकॅप्ड खेळाडूही करोडपती बनले आहेत.

शशांक सिंग ते मोहसीन खान… २० लाखांचे अनकॅप्ड खेळाडू करोडपती झाले, दिवाळीच्या दिवशीच नशीब चमकलं, पाहा
शशांक सिंग ते मोहसीन खान… २० लाखांचे अनकॅप्ड खेळाडू करोडपती झाले, दिवाळीच्या दिवशीच नशीब चमकलं, पाहा

इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठी सर्वच संघांनी आपापली रिटेन्शन यादी जाहीर करण्यात आली आहे. हेनरिक क्लासेन हा रिटेन्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. क्लासेनला सनरायझर्स संघाने २३ कोटी रुपये देऊन कायम ठेवले. 

याशिवाय निकोलस पूरन आणि विराट कोहली यांनाही २१-२१ कोटी रुपये मिळाले आहेत. हे तिन्ही खेळाडू कॅप्ड प्लेयर आहेत, म्हणजे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या रिटेन्शनमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही पण रिटेन्शनमध्ये  भरपूर पैसे कमावले आहेत. येथे आपण अशाच ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

२० लाखांचा आयुष बदोनी ४ कोटींवर पोहोचला 

लखनौ सुपरजायंट्सकडून गेल्या मोसमात खेळलेल्या आयुष बडोनीला गेल्या मोसमात फक्त २० लाख रुपये मिळाले होते, पण संघाने त्याला आयपीएल २०२५ मध्ये कायम ठेवले आहे. बडोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले असून त्याला ४ कोटी रुपये मिळाले आहेत.

अभिषेक पोरेल

अभिषेक पोरेलने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने अभिषेक पोरेलला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे. IPL २०२४ मध्ये अभिषेकचा पगार फक्त २० लाख रुपये होता, पण त्याला ४ कोटी रुपये रिटेनशनमध्ये मिळाले.

मोहसीन खान

आयपीएल २०२४ मध्ये लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळणारा मोहसीन खानही कोट्यधीश बनला आहे. मोहसीन खानला लखनौ सुपरजायंट्स संघाने गेल्या मोसमात २० लाख रुपयांना विकत घेतले होते, परंतु रिटेन्शनमध्ये मोहसीनला अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटी रुपये मिळाले आहेत.

हर्षित राणा

गेल्या मोसमात आपल्या गोलंदाजीने चमक दाखवणाऱ्या हर्षित राणालाही फ्रँचायझीने कायम ठेवले आहे. KKR संघाने IPL २०२५ साठी हर्षित राणाला ४ कोटी रुपये दिले आहेत. IPL २०२४ मध्ये हर्षित राणाला KKR कडून फक्त २० लाख रुपये मिळाले होते. अशाप्रकारे हर्षित राणाही दिवाळीच्या मुहुर्तावर कोट्यधीश झाला आहे.

शशांक सिंग

पंजाब किंग्सने प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंगला कायम ठेवले आहे. हे दोन्ही खेळाडू अनकॅप्ड आहेत. पंजाबने २०२४ च्या लिलावात शशांक सिंगला २० लाखांत खरेदी केले होते. पण आता पंजाबने शशांकला ५.५ कोटी रुपये देऊन रिटेन केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या