मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Pat Cummins : लग्न करा आणि एका वर्षात वर्ल्डकप ट्रॉफी जिंका, पॉंटिंग-धोनी ते कमिन्स सर्वांसोबत असंच घडलं, पाहा

Pat Cummins : लग्न करा आणि एका वर्षात वर्ल्डकप ट्रॉफी जिंका, पॉंटिंग-धोनी ते कमिन्स सर्वांसोबत असंच घडलं, पाहा

Nov 20, 2023 07:06 PM IST

ind vs aus world cup final 2023 : या विचित्र योगायोगाची सुरुवात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगपासून झाली. यानंतर महेंद्रसिंग धोनी, इऑन मॉर्गन आणि पॅट कमिन्ससारखे कर्णधार या यादीत सामील झाले.

ind vs aus world cup final 2023
ind vs aus world cup final 2023

IND vs AUS, Pat Cummins : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने भारताचा धुव्वा उडवला. कर्णधार पॅट कमिन्ससाठी हे वर्ष अतिशय शानदार गेले आहे. या वर्षात पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाने टेस्ट चॅम्पियनशीप, एशेस मालिका आणि वनडे वर्ल्डकप जिंकून दिला आहे.

आता या वर्ल्डकप विजयासह पॅट कमिन्स एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे. वास्तविक, पॅट कमिन्स त्या कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे जे लग्नानंतर एका वर्षातच वर्ल्ड चॅम्पियन झाले आहेत.

याआधी रिकी पाँटिंग, एमएस धोनी आणि इऑन मॉर्गन यांच्यासोबत हा विचित्र योगायोग घडला आहे. आता या यादीत पॅट कमिन्सचे नाव जोडले गेले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या कर्णधारांनी लग्नानंतर जिंकले वर्ल्डकप

गेल्या वर्षीच पॅट कमिन्सने त्याची मैत्रीण बेकी बोस्टन हिच्याशी लग्न केले. यासोबतच लग्नाच्या एक वर्षांनंतर पॅट कमिन्स वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे.

अशाच प्रकारे इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनदेखील लग्नाच्या एका वर्षानंतर वर्ल्ड चॅम्पियन बनला होता. इयॉन मॉर्गनने २०१८ मध्ये तारा रिजवेशी लग्न केले. एक वर्षानंतर मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने वर्ल्डकप २०१९ जिंकला. इंग्लंडने विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडचा पराभव केला होता.

या विचित्र योगायोगाची सुरुवात रिकी पाँटिंगपासून

याच्याही आधी भारताचा माजी कॅप्टन एमएस धोनीसोबतही हा विचित्र योगायोग घडला आहे. धोनीने २०१० मध्ये साक्षी रावतसोबत लग्न केले होते. यानंतर भारताने धोनीच्या नेतृत्वात २०११ चा वर्ल्डकप जिंकला होता.

तर धोनीच्या आधी २००३ मध्ये रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला होता. त्याच्या एक वर्षआधी म्हणजेच, २००२ मध्ये पाँटिंगने रियाना जेनिफरसोबत लग्नगाठ बांधली होती. रिकी पाँटिंगपासूनच या योगायोगाची सुरुवात सुरुवात झाली होती.

WhatsApp channel