India vs Eengland Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी २५ जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या कसोटी मालिकेसाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.
रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल. पण आज आपण येथे अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. परंतु भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी त्यांची निवड झाली नाही.
सौरभ कुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. सौरभ कुमारने उत्तर प्रदेशसाठी ६५ प्रथम श्रेणी सामन्यात २८० विकेट घेतल्या आहेत. याशिवाय तो इंडिया-ए संघाचा भाग आहे, पण आता त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही.
वॉशिंग्टन सुंदर नेहमी टीम इंडियातून आत-बाहेर होत असतो. वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियासाठी ४ कसोटी खेळल्या आहेत. यात त्याची तीन अर्धशतकं आहेत. एक फलंदाज म्हणून, या खेळाडूने कसोटी फॉर्मेटमध्ये ६६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत, परंतु इंग्लंड मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. गोलंदाजीतही तो चांगला फिरकीपटू आहे.
बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनचा अनेकवेळा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे, मात्र आतापर्यंत त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. अभिमन्यू इसवरनने ८९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
या यादीत सरफराज खानच्या नावाचाही समावेश आहे. सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे, मात्र आजपर्यंत तो टीम इंडियाचा भाग बनू शकलेला नाही. वास्तविक, श्रेयस अय्यर मधल्या फळीत सतत संघर्ष करत आहे, अशा परिस्थितीत सरफराज खानला टीम इंडियाचा भाग बनवता येऊ शकते. पण मॅनेजमेंटने त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहेे.
रजत पाटीदारचा देशांतर्गत रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. रजत पाटीदारने ५४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४५ च्या सरासरीने ३८४५ धावा केल्या आहेत. या खेळाडूच्या नावावर ११ प्रथम श्रेणी शतके आहेत. मात्र भारत-इंग्लंड मालिकेसाठी रजत पाटीदारची निवड झालेली नाही.