मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  All-Weather Stadium : आता पावसामुळे सामना थांबणार नाही, 'या' ठिकाणी बनणार जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम

All-Weather Stadium : आता पावसामुळे सामना थांबणार नाही, 'या' ठिकाणी बनणार जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम

Jul 09, 2024 12:46 PM IST

जगातील पहिले ऑल वेदर इनडोअर क्रिकेट स्टेडियम ऑस्ट्रेलियात बांधले जाणार आहे, जेणेकरुन कोणतेही खराब हवामान सामन्यात अडथळा आणू शकणार नाही. हे स्टेडियम ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया बेटावर बांधले जाणार आहे.

All-Weather Stadium : आता पावसामुळे सामना थांबणार नाही, 'या' ठिकाणी बनणार जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम
All-Weather Stadium : आता पावसामुळे सामना थांबणार नाही, 'या' ठिकाणी बनणार जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम

क्रिकेट सामन्यांमध्ये वाईट हवामानाचा अनेकदा संघांना फटका बसतो. विशेषत: अनेक वेळा पावसामुळे मोठ्या स्पर्धा खराब होतात. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांसाठी आणि क्रिकेटपटूंसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

जगातील पहिले ऑल वेदर इनडोअर क्रिकेट स्टेडियम ऑस्ट्रेलियात बांधले जाणार आहे, जेणेकरुन कोणतेही खराब हवामान सामन्यात अडथळा आणू शकणार नाही. हे स्टेडियम ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया बेटावर बांधले जाणार आहे.

स्टेडियम अनेक सुविधांनी सुसज्ज असेल

मॅक्वेरी पॉइंट स्टेडियम असे या मैदानाचे नाव असून त्याची आसनक्षमता २३ हजार असेल. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे छत पारदर्शक असेल, त्यामुळे मैदानात प्रकाश येत राहील. तसेच, क्रिकेटचा चेंडू त्यावर आदळणार नाही अशा पद्धतीने छत तयार करण्यात येणार आहे. म्हणजे खेळ थांबवण्याचे कारणच उरणार नाही!

ट्रेंडिंग न्यूज

तस्मानियाचा सागरी वारसा लक्षात घेऊन या स्टेडियमची रचना करण्यात आली आहे. याशिवाय आदिवासी समाजातील सदस्यांच्या सूचनांचाही समावेश करण्यात आला आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी विशेष सुविधा देखील असतील, जसे की १५०० लोकांसाठी फंक्शन रूम, जे माउंट वेलिंग्टनचे सुंदर दृश्य दाखवेल. याशिवाय स्टेडियममध्ये मैफिली आणि इतर कार्यक्रमही होऊ शकतात.

या प्रकल्पाबाबत काही वाद आहेत. मैदानासाठी निवडलेली जागा योग्य नसल्याचे काही लोकांचे मत आहे. पण, या स्टेडियमच्या उभारणीबाबत बहुतांश लोकांमध्ये उत्साह आहे. २०२८ पर्यंत हे स्टेडियम तयार होईल आणि क्रिकेट चाहत्यांना वर्षभर क्रिकेटचा आनंद घेता येईल, अशी अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा मंत्र्यांनी माहिती दिली

क्रीडा मंत्री निक स्ट्रीट म्हणाले की, या स्टेडियमच्या बांधकामामुळे तस्मानियन संघांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

तसेच,एका वृत्तानुसार, ते म्हणाले, “या स्टेडियमचे बांधकाम ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीग (एएफएल) आणि एएफएलडब्ल्यू संघांना आमच्याच मैदानावर खेळताना पाहण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, हे ठिकाण आम्हाला बरेच काही देऊ शकेल. ” ेस्टेडियमच्या डिझाईनमध्ये केवळ तांत्रिकच नव्हे तर सांस्कृतिक गरजाही लक्षात ठेवल्या गेल्या आहेत, यावर त्यांनी भर दिला.

WhatsApp channel