Novak Djokovic Talks About Virat Kohli : टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली याचे जगभरात चाहते आहेत. विराट जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. जगभरातील विविध खेळाडूही विराटचे कौतुक करताना दिसतात.
दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोवि हा देखील विराट कोहलीचा मोठा चाहता आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणाता व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जोकोविच विराटबाबत बोलताना दिसत आहे.
वास्तविक, सर्बियाचा टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचने विराटबाबत आपले मत व्यक्त केले आहे. नोव्हाक जोकोविच म्हणाला की, मी गेल्या काही वर्षांपासून विराट कोहलीशी थोडं-थोडं मेसेजेसच्या माध्यमातून बोलत आहे. मात्र, आजतागायत आम्हा दोघांना समोरासमोर भेटण्याची संधी मिळाली नाही.
सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविच म्हणाला की, मी विराट कोहलीचा खूप आदर करतो. विराट कोहलीशी बोलणे आणि त्याचे म्हणणे ऐकणे ही सन्मानाची आणि बहुमानाची बाब असल्याचेही तो म्हणाला.
त्याचवेळी नोव्हाक जोकोविचचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
दोन दिवसांआधी नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ हे क्रिकेट खेळताना दिसले होते. या प्रसंगाचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता.