मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  India In T20 : भारत टी-20 क्रिकेटचा किंग, रोहित शर्माच्या संघानं केला नवा विक्रम, पाहा

India In T20 : भारत टी-20 क्रिकेटचा किंग, रोहित शर्माच्या संघानं केला नवा विक्रम, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 15, 2024 02:10 PM IST

Team India In T20 : टीम इंडिया गेल्या काही काळापासून आपल्या भूमीवर चांगली कामगिरी करत आहे. गेल्या १० वर्षांपासून टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. पण द्विपक्षीय मालिकेत टीम इंडिया बादशहा म्हणून समोर आली आहे.

Team India In T20
Team India In T20 (AFP)

टीम इंडियाने इंदूर येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

भारतीय संघासाठी गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. यानंतर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा केल्या.

प्रत्युत्तरात भारताने यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर टीम इंडियाने लक्ष्याचा सहज पाठलाग केला. दोघांनी अर्धशतके झळकावली.

भारत सलग १५ द्विपक्षीय मालिकांमध्ये अजिंक्य

टीम इंडिया गेल्या काही काळापासून आपल्या भूमीवर चांगली कामगिरी करत आहे. गेल्या १० वर्षांपासून टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. पण द्विपक्षीय मालिकेत टीम इंडिया बादशहा म्हणून समोर आली आहे.

भारताने जून २०१९ पासून घरच्या मैदानावर १५ T20 द्विपक्षीय मालिका खेळल्या आहेत. यापैकी एकही भारताने गमावली नाही. भारतीय संघाने १३ टी-20 द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. तर दोन ड्रॉ झाल्या आहेत.

एकूणच, भारतीय संघाने आत्तापर्यंत घरच्या मैदानावर ३० द्विपक्षीय T20 मालिका खेळल्या आहेत, त्यापैकी २० जिंकल्या आहेत आणि फक्त ४ मालिका गमावल्या आहेत.

रोहितने या दोन खेळाडूंचे कौतुक केले

विशेष म्हणजे, भारतीय संघ पहिल्यांदाच अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 द्विपक्षीय मालिका खेळत आहे आणि ही मालिका भारताने जिंकली आहे. भारताने पहिला आणि दुसरा टी-२० सामना ६-६ गडी राखून जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. सामन्यानंतर कर्णधार रोहितने यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचेही कौतुक केले आहे.

रोहित शर्मा शुन्यावर बाद

अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांनी अप्रतिम खेळी केली. या दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताची सुरुवात वाईट झाली. कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर शुन्यावर क्लीन बोल्ड झाला. यानंतर जैस्वालने ६८ धावांची तर दुबेने ६३ धावांची खेळी खेळली.

याआधी, अक्षर पटेलने सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत १७ धावा देत २ बळी घेतले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi