टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मायदेशात जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडिया आज म्हणजेच ४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. या ठिकाणी पहाटे ४ वाजल्यापासून चाहते चॅम्पियन्स आणि ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहत होते.
एअरपोर्टवरून टीम इंडिया थेट हॉटेलमध्ये पोहोचली. यानंतर टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. आता जल्लोषाचा पुढचा कार्यक्रम मुंबईत होणार आहे. भारतीय संघाची खुल्या बसमधून विजयी मिरवणूक निघणार आहे. या ओपन बसचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, टीम इंडिया दुपारी ४ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचेल. यानंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यान, टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघेल. संध्याकाळी ५ ते ७ पर्यत दोन तास ही मिरवणूक चालणार आहे. या विजयी मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये एक विशेष कार्यक्रम रंगणार आहे.
टीम इंडियाची मिरवणूक ज्या बसवरून निघणार आहे, त्या ओपन बसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बस पूर्ण निळ्या रंगाची आहे. त्या बसवर टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आनंद साजरा केला, त्याचा फोटो आहे. बसच्या समोर चॅम्पियन्स २०२४ असे लिहिलेले आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी ट्विट करून चाहत्यांनी टीम इंडियाच्या विजययात्रेत सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून भारतीय चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या