मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत पीच कशी असणार स्पष्ट झालं, टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज खेळणार

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत पीच कशी असणार स्पष्ट झालं, टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज खेळणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 13, 2024 11:16 AM IST

India Test Squad Against England : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाने ४ फिरकीपटूंची निवड केली आहे. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना टीम इंडियात स्थान मिळाले आहे. यानंतर

India Test Squad Against England
India Test Squad Against England (PTI)

India vs England Test Series : टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. २५ जानेवारीपासून ही मालिका भारतीय भुमीवर सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लवकरच या मालिकेची तयारी सुरू करणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाने ४ फिरकीपटूंची निवड केली आहे. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना टीम इंडियात स्थान मिळाले आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत खेळपट्टी कशी, असे स्पष्ट झाले. तसेच, भारतीय पीचेसवर भारतीय फिरकीपटूंचा सामना करणे इंग्लंडसाठी सोपे नसेल. 

भारतीय मैदानावर फिरकीपटू बर्‍याच प्रमाणात यशस्वी होतात. भारताला त्यांच्याच मैदानावर कसोटीत आव्हान देणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही. इंग्लंडच्या बझबॉल गेमला टक्कर देण्यासाठी टीम इंडियाने ४ फिरकीपटू ठेवले आहेत. 

फिरकीपटू रविंद्र जडेजाने आतापर्यंत ६८ कसोटी सामन्यांमध्ये २८०४ धावा केल्या आहेत. त्याने ३ शतके आणि १९ अर्धशतके केली आहेत. तसेच, जडेजाने २७५ विकेट्स घेतल्या आहेत.

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ९५ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ५ शतके आणि १४ अर्धशतके केली आहेत. त्याने टेस्ट फॉरमॅटमध्ये ३१९३ धावा केल्या आहेत.अश्विनने ४९० विकेट्सही घेतल्या आहेत. 

जडेजा-अश्विनसोबत टीम इंडियाने अक्षर पटेलल आणि कुलदीप यादव यांनाही संघात ठेवले आहे. अक्षर सध्या भारताच्या T20 संघाचा भाग आहे आणि तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळत आहे. टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने २ विकेट घेतल्या होत्या.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद यादव. , मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi