मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  अफगाणिस्ताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटला संधी, पाहा संपूर्ण संघ

अफगाणिस्ताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटला संधी, पाहा संपूर्ण संघ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 07, 2024 07:21 PM IST

India squad for Afghanistan T20 series : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा कॅप्टन आहे. तर विराट कोहली आणि संजू सॅमसन पुन्हा टी-20 खेळताना दिसणार आहेत.

India squad for Afghanistan T20 series
India squad for Afghanistan T20 series (ANI )

India squad for T20 series against Afghanistan : रोहित शर्माचे कर्णधार म्हणून टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे. विराट कोहलीही पुन्हा एकदा टीम इंडियाकडून टी-20 फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत स्थान देण्यात आले आहे.

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाहीत. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड देखील या मालिकेत दिसणार नाहीत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव. , मुकेश कुमार, आवेश खान.

हार्दिक पांड्याने नोव्हेंबर २०२२ पासून टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळली आहे. मात्र दुखापतीमुळे तो संघाचा भाग असणार नाही. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या आता थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. इशान किशनच्या जागी निवडकर्त्यांनी संजू सॅमसनवर विश्वास व्यक्त केला असून तो बऱ्याच कालावधीनंतर टी-20 संघात परतला आहे. 

केएल राहुल आणि श्रेयस अय्यरसाठीही टी-20 संघाचे दरवाजे बंद झाले आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत गोलंदाजी विभागातही बदल झालेला आहे. युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना संधी मिळालेली नाही. फिरकीची जबाबदारी अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांच्याकडे आहे. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार या युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला जात आहे.

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20- ११ जानेवारी- मोहाली

दुसरा T20- १४ जानेवारी- इंदूर

तिसरा T20- १७ जानेवारी- बेंगळुरू

भारत-अफगाणिस्तान टी-20 कोणत्या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार?

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिका स्पोर्ट्स18 – 1 (SD + HD) आणि स्पोर्ट्स 18 – 2 या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच, भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग जियो सिनेमा अ‍ॅपवर पाहता येईल.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi