U 19 Asia Cup 2023 : आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, ६ मराठमोळ्या क्रिकेटपटूंची निवड
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  U 19 Asia Cup 2023 : आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, ६ मराठमोळ्या क्रिकेटपटूंची निवड

U 19 Asia Cup 2023 : आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, ६ मराठमोळ्या क्रिकेटपटूंची निवड

Nov 25, 2023 09:47 PM IST

india squad १९ for under 19 asia cup : १९ वर्षीय उदय सहारन हा राजस्थानचा रहिवासी आहे, पण तो पंजाबकडून खेळतो. मागील अंडर-१९ विश्वचषकादरम्यान त्याची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती.

U 19 Asia Cup 2023
U 19 Asia Cup 2023

अंडर १९ आशिया कप UAE मध्ये खेळला जाणार आहे. या १९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर (शनिवार) रोजी बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट निवड समितीने १५ सदस्यांची यादी जाहीर केली. या अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत उदय सहारन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

१९ वर्षीय उदय सहारन हा राजस्थानचा रहिवासी आहे, पण तो पंजाबकडून खेळतो. मागील अंडर-१९ विश्वचषकादरम्यान त्याची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. निवडकर्त्यांनी १९ वर्षांखालील आशिया कपसाठी ३ खेळाडूंना स्टँडबाय म्हणून स्थान दिले आहे. तर ४ खेळाडू राखीव म्हणून राहतील. हे राखीव खेळाडू संघासोबत प्रवास करणार न

आशिया कपसाठी भारताचा अंडर-१९ संघ : अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (विकेटकीपर), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार) ), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

ट्रॅव्हल स्टँडबाय खेळाडू: प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन.

राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी. विघ्नेश, किरण चोरमले

६ मराठी खेळाडूंना संधी

अंडर १९ आशिया कपच्या संघात ६ मराठमोळ्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. आहे. यात अर्शिन कुलकर्णी आणि सचिन धस हे महाराष्ट्राकडून खेळतात. तर मुशीर खान मुंबईकडून खेळतो. या तिघांची मुख्य १५ सदस्यीय संघात निवड झाली आहे. तर मुंबईचा प्रेम देवकर ट्रॅव्हल रिझर्वमध्ये आहे. 

सोबतच दिग्विजय पाटील आणि किरण चोरमले हे मराठी खेळाडू राखीवमध्ये आहेत. पण हे दोघे संघासोबत प्रवास करणार नाहीत.

१० डिसेंबरला भारत- पाकिस्तान सामना

१९ वर्षांखालील आशिया चषक ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ८ डिसेंबर रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यानंतर १० डिसेंबरला भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल.

भारतीय संघ १२ डिसेंबरला नेपाळला भिडणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १७ डिसेंबर रोजी दुबई येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेचा सध्याचा चॅम्पियन आहे आणि भारताने एकूण ८ वेळा १९ वर्षांखालील आशिया कपचे जेतेपद पटकावले आहे.

आगामी अंडर १९ वर्ल्डकपसाठी आशिया कप महत्वाचा

दरम्यान, आगामी अंडर १९ वर्ल्डकपसाठी ही अंडर १९ आशिया कप स्पर्धा खूप महत्त्वाची असेल. आगामी अंडर-१०९ विश्वचषक जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळवला जाणार आहे.

भारतीय संघ अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. याशिवाय २०१६ आणि २०२० मध्ये भारत उपविजेता ठरला आहे.

Whats_app_banner