Team India Schedule : टी-20 वर्ल्डकपनंतरही टीम इंडियाचं वेळापत्रक व्यस्त, हे तीन मोठे संघ भारत दौऱ्यावर येणार-team india schedule bcci announces indian cricket team schedule for 2024 2025 home season india to host nz england ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India Schedule : टी-20 वर्ल्डकपनंतरही टीम इंडियाचं वेळापत्रक व्यस्त, हे तीन मोठे संघ भारत दौऱ्यावर येणार

Team India Schedule : टी-20 वर्ल्डकपनंतरही टीम इंडियाचं वेळापत्रक व्यस्त, हे तीन मोठे संघ भारत दौऱ्यावर येणार

Jun 20, 2024 05:38 PM IST

indian cricket team schedule For 2024-2025 : बीसीसीआयने २०२४-२०२५ साठी भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वर्षभरात इंग्लंडसह, न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ भारतात येणार आहेत.

Team India Schedule : टी-20 वर्ल्डकपनंतरही टीम इंडिया व्यस्त, हे तीन मोठे संघ भारत दौऱ्यावर येणार
Team India Schedule : टी-20 वर्ल्डकपनंतरही टीम इंडिया व्यस्त, हे तीन मोठे संघ भारत दौऱ्यावर येणार (PTI)

Team India Schedule For 2024-2025 : भारतीय क्रिकेट संघाचे पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. या क्रिकेट मालिकांचे वेळापत्रक बीसीसीआयने आज गुरुवारी (२० जून) जाहीर केले आहे. भारतीय संघाचे फेब्रुवारी २०२५ पर्यंतचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

बांगलादेशचा संघ यावर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान भारत दौऱ्यावर येत आहे. या मालिकेत २ कसोटी आणि ३ टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे.

यानंतर १ ऑक्टोबरपासून कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ३ T20 सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध ६, ९ आणि १२ ऑक्टोबर रोजी ३ T20 सामने खेळताना दिसणार आहे. या सामन्यांचे यजमानपद धर्मशाला, दिल्ली आणि हैदराबादला देण्यात आले आहे.

न्यूझीलंड ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान भारतात येणार 

न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येजाणार आहे. या मालिकेत ३ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बेंगळुरू येथे होणार आहे. दुसरा कसोटी सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात, तर तिसरा आणि शेवटचा सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईत खेळवला जाईल. 

इंग्लंडचा संघही भारत दौऱ्यावर येईल

पुढील वर्षी म्हणजे जानेवारी २०२५ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येईल. या मालिकेत ५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पहिला T20 सामना २२ जानेवारीपासून चेन्नईत खेळवला जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २५ जानेवारीला कोलकात्यात आणि तिसरा सामना २८ जानेवारीला राजकोटमध्ये होणार आहे. मालिकेतील चौथा सामना ३१ जानेवारीला पुण्यात होणार आहे. शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना २ फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे.

मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना ६ फेब्रुवारीला नागपुरात, दुसरा सामना ९ फेब्रुवारीला कटकमध्ये आणि शेवटचा सामना १२ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. यासह मालिका संपणार आहे.

टीम इंडियाचे आगामी वेळापत्रक

भारत-वि. बांगलादेश कसोटी मालिका मालिका

पहिली कसोटी- १९-२३ सप्टेंबर २०२४, चेन्नई

दुसरी कसोटी- २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४, कानपूर

भारत वि बांगलादेश T20 मालिका

पहिला T20- ६ ऑक्टोबर २०२४, धर्मशाला

दुसरा T20- ९ ऑक्टोबर २०२४, दिल्ली

तिसरा T20- १२ ऑक्टोबर २०२४, हैदराबाद

 

भारताचा न्यूझीलंड दौरा

भारत वि. न्यूझीलंड कसोटी मालिका

पहिली कसोटी- १६-२० ऑक्टोबर २०२४, बेंगळुरू

दुसरी कसोटी- २४-२८ ऑक्टोबर २०२४, पुणे

तिसरी कसोटी- १-५ नोव्हेंबर २०२४, मुंबई

 

भारताचा इंग्लंड दौरा

भारत वि. इंग्लंड T20 मालिका

पहिला T20 - २२ जानेवारी २०२५, चेन्नई

दुसरा T20 - २५ जानेवारी २०२५, कोलकाता

तिसरा T20 - २८ जानेवारी २०२५, राजकोट

चौथा T20 - ३१ जानेवारी २०२५, पुणे

पाचवा T20- २ फेब्रुवारी २०२५, मुंबई

भारत वि. इंग्लंड एकदिवसीय मालिका

पहिला वनडे – ६ फेब्रुवारी २०२५, नागपूर

दुसरी वनडे – ९ फेब्रुवारी २०२५, कटक

तिसरी वनडे – १२ फेब्रुवारी २०२५, अहमदाबाद

Whats_app_banner