मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India Head Coach : टीम इंडियाच्या कोचपदासाठी दोघांचा इंटरव्ह्यू झाला, गंभीरला मिळतेय या दिग्गजाकडून टक्कर

Team India Head Coach : टीम इंडियाच्या कोचपदासाठी दोघांचा इंटरव्ह्यू झाला, गंभीरला मिळतेय या दिग्गजाकडून टक्कर

Jun 18, 2024 07:42 PM IST

Team India New Head Coach : बीसीसीआय लवकरच टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करणार आहे. पण गंभीरसोबतच आणखी एका दिग्गजाची मुलाखत घेण्यात आली आहे.

Team India Head Coach : कहानी मे ट्विस्ट… कोचपदासाठी गंभीरला ‘या’ दिग्गजाची टक्कर, BCCI ने दोघांचा इंटरव्ह्यू घेतला
Team India Head Coach : कहानी मे ट्विस्ट… कोचपदासाठी गंभीरला ‘या’ दिग्गजाची टक्कर, BCCI ने दोघांचा इंटरव्ह्यू घेतला (AFP)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया मंडळाने जवळपास पूर्ण केली आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो अशी बातमी होती. पण आता एका वृत्तानुसार बीसीसीआयने गंभीरसह आणखी एका दिग्गजाची मुलाखत घेतली आहे.

गंभीरने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन मुलाखत दिली आहे. टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका चॅनलच्या वृत्तानुसार, क्रिकेट सल्लागार समितीने मंगळवारी (१८ जून) गौतम गंभीर तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू वूरकीरी व्यंकट रमन यांची मुलाखत घेतली. गंभीर सध्या मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

तसेच, रमण हेदेखील प्रबळ दावेदार आहेत. मुलाखती दरम्यान त्यांनी खूप छान सादरीकरण केले आहे. मात्र नवा मुख्य प्रशिक्षक कोण असेल याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, गौतम गंभीरने व्हर्च्युअल मुलाखत दिली आहे. पण रामन यांनी उपस्थित राहून प्रझेंटेशन दिले. आता CAC बुधवारी परदेशी उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. यामध्ये कोणाचा सहभाग असणार आहे हे उघड झालेले नाही.

बीसीसीआय नव्या निवडकर्त्याचाही शोध घेत आहे. यासाठी काही उमेदवारांची निवड करण्यात आली असून, लवकरच चीफ सिलेक्टर पदासाठीही मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची लवकरच घोषणा होऊ शकते. भारताचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ २०२४ च्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपणार आहे. द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज केला नाही. त्यांना आता ब्रेक हवा आहे. द्रविड हे सलग दोन टर्म टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

WhatsApp channel