भारताचे माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि गौतम गंभीर यांना एका मुलाखतीत रंजक प्रश्न विचारण्यात आले. या दोघांना भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. याची दोघांनी मजेशीर उत्तरे दिले.
दिल्ली प्रीमियर लीग (DPL) दरम्यान गंभीर आणि धवनची मुलाखत विचारलेल्या प्रश्नात गौतम गंभीरने विराट कोहलीला क्रिकेटचा सम्राट म्हटले आहे.
विराट भारतीय संघात नवीन असताना गंभीरने त्याला खूप साथ दिली. एकदा तर गंभीरने आपला सामनावीराचा पुरस्कार कोहलीला दिला होता.
एकीकडे गौतम गंभीरने विराट कोहलीला 'शहेनशाह' म्हटले तर दुसरीकडे युवराज सिंग याला क्रिकेटचा बादशाह म्हणून निवडले.
यासोबतच गौतम गंभीरने सौरव गांगुलीला 'टायगर' आणि टीम इंडियाचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह याला 'प्लेयर' अशी पदवी दिली. तसेच, गौतम गंभीरने स्वत:ला 'अँग्री यंग मॅन' ही उपाधी दिली.
दुसरीकडे शिखर धवन यालाही असेच प्रश्न विचारण्यात आले, मात्र त्याची उत्तरे गंभीरपेक्षा वेगळी होती. त्याने प्रथम विराट कोहलीला क्रिकेटचा बादशाह म्हटले आणि कोहलीला 'अँग्री यंग मॅन' म्हटले.
टीम इंडियाचा गब्बर असलेल्या धवनने हार्दिक पांड्याला 'दबंग' आणि जसप्रीत बुमराहला 'शहेनशाह' ही पदवी दिली. त्याने शुभमन गिलला 'प्लेयर' आणि सचिन तेंडुलकरला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हटले.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असल्याने गौतम गंभीरसाठी पुढील काही महिने खूप कठीण जाणार आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताला नुकतीच श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका गमवावी लागली होती.
आता भारतासमोर एक, दोन नव्हे तर तीन कसोटी मालिकेचे आव्हान आहे. प्रथम, टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामने खेळायचे आहेत.
वर्षअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी हीदेखील अत्यंत महत्त्वाची मालिका असेल.